मॅचनंतर दादा ही कामं करायला सांगायचा, केबीसीच्या सेटवर सेहवाग-गांगुलीचा कलगीतुरा, बिग बी बघतच राहिले!

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 04, 2021 | 1:35 PM

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग शुक्रवारी 'कोन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात आले होते. चॅरीटीसाठी त्यांनी तब्बल 25 रुपये जिंकले असून यावेळी अनेक गप्पा गोष्टींनी शोला चारचाँद लागले.

मॅचनंतर दादा ही कामं करायला सांगायचा, केबीसीच्या सेटवर सेहवाग-गांगुलीचा कलगीतुरा, बिग बी बघतच राहिले!
अमिताभ बच्चन आणि वीरेंद्र सेहवाग

मुंबई : भारतीय संघातील माजी क्रिकेपटू वीरेंद्रे सेहवागचं (Virender Sehwag) नाव जरी ऐकलं तरी चेहऱ्यावर हसू उमटतं. कायम हसतमुख असणाऱ्या सेहवागने एकेकाळी बॅटने क्रिकेटच्या मैदानात तुफान फटकेबाजी केली होती. आताही तो तुफान फटकेबाजी करतो फक्त ही फटकेबाजी सामन्याच्या कॉमेन्ट्रीवेळी शब्दातून किंवा सोशल मीडियावर मजेशीर पोस्ट आण कमेंट्समधून करत असतो. नुकतंच त्याने कोन बनेगा करोडपती या शोमध्ये गांगुली सोबत आला असताना अनेक आठवणींना उजाळा देत मनसोक्त गप्पा गोष्टी केल्या.

शुक्रवारी सेहवाग आणि  गांगुली (Sourav Ganguly) यांना अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) होस्ट करत असलेल्या KBC शोमध्ये आमंत्रण होतं यावेळी त्यांनी चॅरीटीसाठी पैसे देण्यासाठी या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी अनेक गप्पा टप्पासोंबत सेगहवागने गांगुलीचं एक सिक्रिेटही खोललं. या गोष्टीपासून गांगुलीने नकार दिला असला तरी सेहवाग मात्र त्याच्या शब्दावर ठाम आहे.  सेहवागने सांगितलं तसं सामन्यानंतर पत्रकार परिषदेत जाताना गांगुली इतर खेळाडूंना त्याची बॅग भरुन ठेवायला सांगत. यावर गांगुलीने या गोष्टीपासून पूर्णपणे नकार दिला असता सेहवागने जहीर खान, आशिष नेहरा, युवराज सिंग यांनाही तुम्ही विचारु शकता असे सांगत आपल्या वक्तव्यावर ठाम राहिला. .

दादासारख दुसरा कर्णधार नाही- सेहवाग

सेहवाग आणि गांगुली यांनी KBC मध्ये खूप मजा मस्ती केली. यावेळी सेहवागने गांगुली कर्णधार असतानाची परिस्थिती सांगितली. सेहवाग म्हणाला, ”मी माझ्या संपूर्ण कारकिर्दीत सौरव गांगुलीसारखा अप्रतिम कर्णधार पाहिला नाही. मी इनेक कर्णधारांच्या संघात खेळलो आहे. पण गांगुली प्रमाणे कोणीच नाही. गांगुलीनेच भारताला परदेशात जाऊन जिंकणं शिकवलं.”

हे ही वाचा-

Ind vs Eng: शार्दूलच्या अर्धशतकी खेळीने इंग्लंडचा ‘डाव’ बिघडवला; आता सहकाऱ्यांनी दिलं ‘हे’ खास निकनेम!

तो परत आला… भारताच्या गोलंदाजीवेळी Jarvo 69 मैदानात, इंग्लंडच्या फलंदाजाला दिला धक्का!

(Cricketer Virender Sehwag tells secrets in dressing room when Sourav Ganguly was captain and kaun banega corepati Show)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI