IPL 2027: ८ वर्षांची साथ संपली! मायकल हसींसह ५ कोचिंग सदस्यांची एक्झिट, CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये मोठी उलथापालथ

CSK Revamp Coaching Staff Ahead of IPL 2027: चेन्नई सुपर किंग्सने आपल्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल केला आहे. पाच वेळच्या विजेत्या संघाने आपले दीर्घकाळचे फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसी यांना निरोप दिला आहे.

IPL 2027: ८ वर्षांची साथ संपली! मायकल हसींसह ५ कोचिंग सदस्यांची एक्झिट, CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये मोठी उलथापालथ
| Updated on: Oct 26, 2026 | 11:51 PM

आयपीएल २०२७ च्या आधी चेन्नई सुपर किंग्सच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा बदल झाला आहे. फ्रँचायझीने सोशल मीडियावर जाहीर केले की, फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसी यांच्यासह कोचिंग स्टाफमधील पाच सदस्य संघातून बाहेर पडले आहेत. चेन्नईने २०२६ च्या हंगामानंतर मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांच्याशीही संबंध तोडले आहेत. त्यांच्या जागी भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान याची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

आता फ्लेमिंगनंतर चेन्नईच्या कोचिंग स्टाफमधून आणखी पाच अनुभवी खेळाडूंना हटवण्यात आले आहे. त्या पोस्टमध्ये सर्वप्रथम मायकल हसी यांचे आभार मानत लिहिले होते की, २००८ मधील पहिल्या हंगामापासून, तुम्ही चेन्नई सुपर किंग्स परिवाराचा एक अविभाज्य भाग राहिला आहात. पिवळ्या जर्सीतील तुमचा प्रवास केवळ तुम्ही केलेल्या धावा किंवा तुम्ही घडवलेल्या खेळाडूंमुळेच नव्हे, तर तुम्ही या फ्रँचायझीला वर्षानुवर्षे दिलेल्या समर्पण, नम्रता आणि अढळ वचनबद्धतेमुळेही ओळखला जातो. आमच्या इतिहासात तुमचे स्थान नेहमीच विशेष राहील, हॅसमिस्टर.

Loading...

गोलंदाजी प्रशिक्षक एरिक सायमन यांच्या निरोपाच्या पोस्टमध्ये म्हटले आहे, २०१८ पासून चेन्नई सुपर किंग्सच्या प्रशिक्षण चमूचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या एरिक सायमन यांनी आमची गोलंदाजी फळी उभारण्यात आणि गेल्या काही वर्षांपासून संघाच्या यशात मोलाची भूमिका बजावली आहे. तुमच्या समर्पित सेवेबद्दल आणि योगदानाबद्दल आम्ही मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद, एरिक सायमन. तुमच्या पुढील वाटचालीस अभिनंदन. आगामी हंगामात मोहित शर्मा संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक असणार आहे.

संघाचे सहाय्यक प्रशिक्षक राजीव कुमार यांच्याविषयी असे लिहिले होते की, चेन्नई सुपर किंग्सच्या प्रशिक्षण चमूचे एक प्रमुख सदस्य म्हणून राजीव कुमार यांनी गेल्या काही वर्षांपासून संघाच्या तयारी, विकास आणि कामगिरीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. खेळाडूंसोबत जवळून काम करण्याची तुमची निष्ठा, तुमचे कौशल्य त्यांना देणे आणि संघाचा पाया मजबूत करणे हा आमच्या प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग राहिला आहे. धन्यवाद, राजीव कुमार. भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.

संघाचे फिजिओ टॉमी सिमसेक यांच्याविषयी असे लिहिले होते, २००८ मधील आमच्या पहिल्या हंगामापासून पडद्यामागे सातत्याने उपस्थित असलेल्या टॉमी सिमसेक यांनी चेन्नई सुपर किंग्सच्या प्रवासात अमूल्य भूमिका बजावली आहे. आमच्या खेळाडूंना ज्यात आमच्या पूर्वीच्या प्रसिद्ध ‘डॅड्स आर्मी’चाही समावेश आहे. तंदुरुस्त आणि सामन्यासाठी सज्ज ठेवण्याप्रती असलेले तुमचे समर्पण, हे गेल्या अनेक वर्षांतील आमच्या यशाचा एक महत्त्वाचा भाग आहे. टॉमी सिमसेक, तुमच्या अनेक वर्षांच्या सेवेबद्दल धन्यवाद.

स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग प्रशिक्षक ग्रेग किंग यांनी लिहिले, प्रत्येक यशस्वी मोहिमेमागे तयारीचे अगणित तास, शिस्त आणि कठोर परिश्रम दडलेले असतात. ग्रेग किंग, स्ट्रेंथ अँड कंडिशनिंगमधील तुमच्या कौशल्याने आमच्या सुपर किंग्सना शारीरिक आव्हानांवर मात करण्यास आणि प्रत्येक हंगामात उत्कृष्ट कामगिरी करण्यास मदत केली आहे. ग्रेग किंग, ‘यलो आर्मी’साठी तुम्ही जे काही केले आहे, त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us