AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CSK vs KKR : केकेआरसमोर 193 रन्सचं टार्गेट, चेन्नई सलग दुसरा सामना जिंकणार की कोलकाता खातं उघडणार?

Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders 1st Innings Highlights : चेन्नई सुपर किंग्सला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 200 धावांचा आकडा गाठता आला नाही. मात्र त्यानंतरही सीएसकेने केकेआरसमोर 193 धावांचं आव्हान ठेवलं आहे.

CSK vs KKR : केकेआरसमोर 193 रन्सचं टार्गेट, चेन्नई सलग दुसरा सामना जिंकणार की कोलकाता खातं उघडणार?
Sanju Samson and Dewald Brevis CSK vs KKRImage Credit source: IPL X Account
| Updated on: Apr 14, 2026 | 10:55 PM
Share

चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2026 स्पर्धेच्या (IPL 2026) 22 व्या सामन्यात घरच्या मैदानात एमए चिदंबरम स्टेडियममध्ये कोलकाता नाईट रायडर्ससमोर 193 रन्सचं टार्गेट ठेवलं आहे. चेन्नईने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 192 रन्स केल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्सने यंदाच्या मोसमात सलग 3 सामने गमावल्यानंतर चौथ्या सामन्यात विजयाची चव चाखली. तर 3 वेळा आयपीएल चॅम्पियन राहिलेल्या कोलकाताची सलग 4 सामन्यांनंतरही पहिल्या विजयाची प्रतिक्षा अजूनही कायम आहे. त्यामुळे केकेआर 193 रन्स करत आपला पहिला सामना जिंकणार की चेन्नई घरच्या मैदानात विजय मिळवण्यात यशस्वी ठरणार? हे थोड्याच वेळात निकालानंतर स्पष्ट होईल.

सीएसकेची बॅटिंग

केकेआरच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन अजिंक्य रहाणे याने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेत चेन्नईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. चेन्नईचा कॅप्टन ऋतुराज गायकवाड याचा अपवाद वगळता यलो आर्मीच्या पहिल्या 5 फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला. मात्र त्यापैकी एकालाही मोठी खेळी करता आली नाही. कॅप्टन ऋतुराज गायकवाड 7 धावांवर बाद झाला. तर संजू सॅमसन आणि डेवाल्ड ब्रेव्हीस या दोघांनी 40 पार मजल मारली. मात्र दोघांपैकी एकालाही अर्धशतकापर्यंत पोहचता आलं नाही.

ओपनर संजू सॅमसनचं याचं अवघ्या 2 धावांनी अर्धशतक हुकलं. संजूने 150 च्या स्ट्राईक रेटने 32 बॉलमध्ये 48 रन्स केल्या. संजूने या खेळीत 3 षटकार आणि 4 चौकार लगावले. बेबी एबी अर्थात डेवाल्ड ब्रेव्हीस याने 29 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 4 फोरसह 41 रन्स केल्या. आयुष म्हात्रे याने चाबूक सुरुवात केली. त्यामुळे आयुष मोठी खेळी करेल, असं वाटत होतं.  मात्र वैभव अरोरा याने आयुषच्या खेळीला ब्रेक लावला. आयुषने 17 बॉलमध्ये 38 रन्स केल्या. आयुषने या दरम्यान 2 सिक्स आणि 6 फोर ठोकले.

लाईव्ह स्कोअरकार्ड

मुंबईकर फलंदाज सर्फराज खान याने 18 बॉलमध्ये 23 रन्स केल्या. सर्फराजने या 23 पैकी 16 रन्स या सिक्स आणि फोरच्या मदतीने केल्या. सर्फराजने 2 सिक्स आणि 1 फोर लगावला. तर शिवम दुबे आणि जेमी ओव्हरटन ही जोडी नाबाद परतली. शिवमने 12 बॉलमध्ये 13 रन्स केल्या. तर जेमी ओव्हरटन याने 7 धावा जोडल्या. केकेआरसाठी कार्तिक त्यागी याने सर्वाधिक 2 विकेट्स मिळवल्या. तर वैभव अरोरा, अनुकूल रॉय आणि सुनील नारायण या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

Follow Us
अमरावतीत प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणींचे लैंगिक शोषण?
अमरावतीत प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणींचे लैंगिक शोषण?.
हा देश कोणाच्या मर्जीने नाही बाबासाहेबांच्या संविधानाने चालणार - सुळे
हा देश कोणाच्या मर्जीने नाही बाबासाहेबांच्या संविधानाने चालणार - सुळे.
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; भक्तांच्या कागदपत्रांचा गैरवापर
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; भक्तांच्या कागदपत्रांचा गैरवापर.
शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर यांची तब्बल 8 तास कसून चौकशी
शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर यांची तब्बल 8 तास कसून चौकशी.
नाचता नाचताच कोसळले... गोरेगावातील ड्रग्स पार्टीमुळे खळबळ
नाचता नाचताच कोसळले... गोरेगावातील ड्रग्स पार्टीमुळे खळबळ.
अशोक खरात प्रकरणात ईडीची कारवाई; कोट्यवधींच्या व्यवहारांचा पर्दाफाश
अशोक खरात प्रकरणात ईडीची कारवाई; कोट्यवधींच्या व्यवहारांचा पर्दाफाश.
त्या विधानावरून राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना घेरले, म्हणाले, ते तर खुद्
त्या विधानावरून राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना घेरले, म्हणाले, ते तर खुद्.
डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त राज ठाकरेंचे ट्वीट, राजकारण्यांचे टोचले कान
डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त राज ठाकरेंचे ट्वीट, राजकारण्यांचे टोचले कान.
1825 कॉल्सचा गूढ उलगडणार? अंजली दमानिया उद्या करणार मोठा खुलासा
1825 कॉल्सचा गूढ उलगडणार? अंजली दमानिया उद्या करणार मोठा खुलासा.
डॉ. बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा, BMCकडून छायाचित्रांचे प्रदर्शन
डॉ. बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा, BMCकडून छायाचित्रांचे प्रदर्शन.