
आयपीएल स्पर्धेतील 18 व्या मोसमातील (IPL 2025) तिसरा सामना हा चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. या सामन्याचं आयोजन हे चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. दोन्ही संघांचा हा या मोसामातील पहिला सामना आहे. ऋतुराज गायकवाड चेन्नईचं नेतृत्व करणार आहे. तर हार्दिक पंड्या याच्यावर एका सामन्याची बंदी आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादव मुंबईचं नेतृत्व करणार आहे. तसेच मुंबईचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह यालाही दुखापतीमुळे सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकावं लागणार आहे. त्यामुळे मुंबईला हार्दिक आणि जसप्रीतची उणीव भासणार, हे निश्चित आहे. त्यामुळे चेन्नईविरुद्धच्या सामन्यासाठी मुंबईची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन कशी असेल? हे जाणून घेऊयात.
रियान रिकेल्टन मुंबईसाठी टॉप ऑर्डरमध्ये स्फोटक बॅटिंग करु शकतो. सोबत रोहित शर्माही असणार. तसेच मधल्या फळीत कर्णधार सूर्यकुमार आणि तिलक वर्मा या दोघांवर मोठी जबाबदारी असणार आहे. ट्रेन्ट बोल्ट, रीस टॉपली आणि दीपक चाहर या त्रिकुटावर वेगवान गोलंदाजीची मदार असणार आहे. तसेच बुमराहच्या अनुपस्थितीत कॉर्बिन बॉश याला संधी मिळू शकते. तसेच पलटणकडे मिचेल सँटनर, कर्ण शर्मा आणि मुजीब उर रहमान फिरकी त्रिकुट आहे. कॅप्टन सूर्या या तिघांपैकी कुणाला संधी देतो? हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.
कर्णधार ऋतुराजसोबत रचीन रवींद्र आणि डेव्हॉन कॉनव्हे या दोघांपैकी कुणीही ओपनिंग करु शकतो. शिवम दुबे, राहुल त्रिपाठी, दीपक हु्ड्डा आणि विजय शंकर या चौकडीवर मिडल ऑर्डरची मदार असेल. तसेच महेंद्रसिंह धोनी आणि रवींद्र जडेजा या अनुभवी जोडीवर फिनिशिंग टच देण्याची जबाबदारी असणार आहे.
मुंबईची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), रोहित शर्मा, रियान रिकेल्टन (विकेटकीपर), तिलक वर्मा, नमन धीर, रॉबिन मिंज, मिचेल सेंटनर, कॉर्बिन बॉश/मुजीब उर रहमान, दीपक चाहर, कर्ण शर्मा, ट्रेन्ट बोल्ट, वीएस पेनमेत्सा आणि अश्वनी कुमार.
मुंबई इंडियन्स संघ: रोहित शर्मा, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, नमन धीर, रायन रिकेल्टन, रॉबिन मिन्झ (विकेटकीपर), मिचेल सँटनर, जसप्रीत बुमराह, रीस टोपली, ट्रेन्ट बोल्ट, दीपक चहर, मुजीब उर रहमान, कृष्णन श्रीजीत, कर्ण शर्मा, कॉर्बिन बॉश, राजा बावा, अर्जुन तेंडुलकर, बेव्हॉन जेकब्स, अश्वनी कुमार, सत्यनारायण राजू आणि विघ्नेश पुथूर.
चेन्नई सुपर किंग्ज संघ: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डेव्हॉन कॉनव्हे, रचिन रवींद्र, विजय शंकर, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, एमएस धोनी (विकेटकीपर), सॅम करन, आर अश्विन, मथीशा पाथिराना, कमलेश नागरकोटी, नॅथन एलिस, मुकेश चौधरी, राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा, खलील अहमद, जेमी ओव्हरटन, शेख रशीद, अंशुल कंबोज, श्रेयस गोपाल, नूर अहमद, गुर्जपनीत सिंग, रामकृष्ण घोष, आंद्रे सिद्धार्थ सी आणि वंश बेदी.
चेन्नई सुपर किंग्स संभाव्य प्लेइंग ईलेव्हन: डेव्हॉन कॉनव्हे/रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), राहुल त्रिपाठी, दीपक हुडा/विजय शंकर, शिवम दुबे, सॅम करन, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), आर अश्विन, नूर अहमद, मथीशा पथिराना, खलील अहमद/अंशुल कंबोज.