
मुंबई: चार वेळा आयपीएलचे (IPL) विजेतेपद पटकावणारा चेन्नई सुपर किंग्सचा संघ सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. अद्यापपर्यंत त्यांना अपेक्षेनुसार कामगिरी करता आलेली नाही. CSK ने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. चारही सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. रवींद्र जाडेजाची टीम अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. उद्या चेन्नईचा सामना चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध होणार आहे. नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. उद्याचा सामना चेन्नईसाठी सोपा नसेल, कारण RCB सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या सीजनमध्ये चेन्नईने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात निराशाजनक कामगिरी केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा संघ अजूनपर्यंत चार सामने खेळला असून तीन सामने त्यांनी जिंकले आहेत.
गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही विभागात आरसीबीची टीम सरस कामगिरी करत आहे. कॅप्टन फाफ डू प्लेसिस फॉर्ममध्ये आहे. त्याशिवाय विराट कोहली सुद्धा धावा करतोय. मागच्या मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात अनुज रावतने दमदार प्रदर्शन केलं होतं. त्याशिवाय शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक फिनिशरच्या रोलमध्ये आहेत.
चेन्नई विरुद्धच्या सामन्याआधी बँगलोरच्या संघात एक बदल निश्चित आहे. हर्षल पटेलच्या बहिणीचं निधन झालं. त्यामुळे त्याला बायो बबलमधून बाहेर पडून घरी जावं लागलं होतं. त्यामुळे उद्या सीएसके विरुद्धच्या सामन्यात तो खेळू शकणार नाही. कारण त्याला तीन दिवसांच क्वारंटाइन पूर्ण कराव लागणार आहे. चेन्नई विरुद्धच्या सामन्यासाठी आरसीबीच्या प्लेइंग इलेवनमध्ये उद्या दुसरा खेळाडू हर्षल पटेलची जागा घेईल. डु प्लेसी सिद्धार्थ कौलला संधी देऊ शकतो. तेच डेविड विलीच्या जागी ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडचा संघात समावेश होईल.
चेन्नईचा संघही खराब प्रदर्शन करतोय. मुकेश चौधरीच्या जागी राजवर्धन हंगरगेकरचा संघात समावेश होऊ शकतो. या व्यतिरिक्त CSK च्या संघात बदल होण्याची शक्यता कमी आहे.
चेन्नई सुपर किंग्स – रवींद्र जाडेजा (कॅप्टन), रॉबिन उथाप्पा, ऋतुराज गायकवाड, मोइन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, एमएस धोनी, ड्वेयन ब्राव्हो, ख्रिस जॉर्डन, महीश तीक्ष्णा, राजवर्धन हंगरगेकर,
RCB संघ – फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅकसवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक, जोश हेझलवूड, वानिंदु हसरंगा, सिद्धार्थ कौल, आकाश दीप, मोहम्मद सिराज,