AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CSK vs RCB IPL 2022 Head to Head: चेन्नई विरुद्ध बँगलोर सामन्यात कोणाचं पारडं जड? पाहा आतापर्यंतची आकडेवारी

आयपीएल-2022 (IPL 2022) मध्ये सध्याचा गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super kings) सामना मंगळवारी फॉर्मात असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरशी (Royal Challengers Bangalore) होईल. हे दोन्ही संघ नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर भिडणार आहेत.

CSK vs RCB IPL 2022 Head to Head: चेन्नई विरुद्ध बँगलोर सामन्यात कोणाचं पारडं जड? पाहा आतापर्यंतची आकडेवारी
CSK vs RCB IPL Head to Head recordsImage Credit source: IPL
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Apr 11, 2022 | 5:03 PM
Share

मुंबई : आयपीएल-2022 (IPL 2022) मध्ये गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super kings) सामना मंगळवारी फॉर्मात असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरशी (Royal Challengers Bangalore) होईल. हे दोन्ही संघ नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर भिडणार आहेत. या हंगामात दोन्ही संघ नवीन कर्णधारांसह मैदानात उतरले आहेत. यावेळी चेन्नईचे कर्णधारपद महेंद्रसिंग धोनीऐवजी रवींद्र जडेजाकडे आहे, तर आरसीबीची कमान विराट कोहलीऐवजी फाफ डू प्लेसिसकडे आहे. चेन्नईसाठी सध्याचा हंगाम चांगला गेलेला नाही. त्यांनी चार सामने खेळले आहेत आणि त्या चारही सामन्यात यलो पलटनचा पराभव झाला आहे. तर बँगलोरचा संघ चांगल्या स्थितीत आहे.

गुणतालिकेत या दोन्ही संघांचे स्थान पाहिल्यास चेन्नई 10व्या स्थानावर आहे. दुसरीकडे, आरसीबीने चालू हंगामातील चारपैकी तीन सामने जिंकले आहेत आणि एका सामन्यातत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. हा संघ सहा गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली यंदाच्या मोसमात आरसीबी खूपच मजबूत दिसत आहे. अशा स्थितीत सध्याचा फॉर्म पाहता मंगळवारी खेळवल्या जाणाऱ्या सामन्यात आरसीबीचं पारडं जड दिसत आहे.

उभय संघांची हेड टू हेड आकडेवारी

उभय संघांमधील एकूण सामन्यांची आकडेवारी पाहिली तर चेन्नईचा संघ आतापर्यंत वरचढ ठरला आहे. या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 29 सामने खेळवण्यात आले आहेत. यापैकी चेन्नईच्या संघाने 19 सामने जिंकले आहेत तर आरसीबी संघाने नऊ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर एका सामन्याचा निकाल लागू शकला नाही. अशा स्थितीत एकूण सामन्यांच्या आकडेवारीत चेन्नईचा संघ मजबूत दिसत आहे.

मागील पाच सामन्यांचे निकाल

दुसरीकडे, या दोन संघांमधील मागील पाच सामन्यांची आकडेवारी पाहिली, तर येथेही चेन्नईचेच वर्चस्व दिसते. चेन्नईने गेल्या पाचपैकी तीन सामने जिंकले आहेत तर आरसीबीने दोन सामने जिंकले आहेत. चेन्नईने 24 सप्टेंबर 2021, 25 एप्रिल 2021 आणि 25 ऑक्टोबर 2021 रोजी खेळवण्यात आलेले सामने जिंकले आहेत. त्याच वेळी, आरसीबीने 10 ऑक्टोबर 2020 आणि 21 एप्रिल 2019 रोजी चेन्नईवर विजय मिळवला होता.

जुने आकडे पाहिले तर चेन्नईचा संघ पुढे आहे. मात्र आता जुने संघ कायम राहिलेले नाहीत. दोन्ही संघांमधील किमान दोन तृतीयांश खेळाडू बदलले आहेत. जसे की, आरसीबीचा सध्याचा कर्णधार पूर्वी चेन्नईचा सलामीवीर होता. त्यामुळे सध्याची कामगिरी पाहिली तर बँगलोरचा संघ चेन्नईवर वरचढ दिसतोय.

इतर बातम्या

IPL 2022 Orange Cap : ऑरेंज कॅपवर जॉस बटलरची पकड कायम, पर्पल कॅपचा मानकरी युझवेंद्र चहल

IPL 2022 Purple Cap : युझवेंद्र चहल पर्पल कॅपचा मानकरी; लखनऊच्या चार महत्त्वाच्या विकेट घेतल्या

IPL 2022 SRH vs GT Live Streaming: जाणून घ्या हैदराबाद विरुद्ध गुजरात सामना कधी आणि कुठे पाहता येईल?

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली