AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Alert: महाराष्ट्रात वारं फिरलं! पुढील सात दिवसात कोसळणार धो धो पाऊस? 4 दिवसांसाठी वेगळाच अलर्ट

Weather Alert: गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. आता पुन्हा राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. आता राज्यात कुठे कुठे पाऊस पडणार वाचा...

| Updated on: Sep 07, 2026 | 7:30 AM
Share
ऑगस्ट महिन्यात राज्यात हवा तसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे समोर आले. आता विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा हजेरी लावणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. चला जाणून घेऊया महाराष्ट्रातील कोकण ते विदर्भ हवामान अपडेट काय आहे.

1 / 5
पुढील काही दिवस राज्याच्या पश्चिम भागातील कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मात्र, कोकण-गोवा परिसरात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस सुरू राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

2 / 5
आज 7 सप्टेंबरला कोकण-गोवा भागात पावसाची शक्यता कायम आहे. त्यानंतरच्या काही दिवसांत उत्तर कोकणात अनेक किंवा बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 8 आणि 9 सप्टेंबर रोजी उत्तर कोकणात बहुतांश ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक पाऊस पडेल असे म्हटले जात आहे.

3 / 5
10 सप्टेंबर रोजी देखील दक्षिण कोकण-गोव्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

10 सप्टेंबर रोजी देखील दक्षिण कोकण-गोव्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

4 / 5
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पुढील 48 तास आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शहरात कमाल तापमान सुमारे 31 ते 32 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 25 ते 26 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. एकंदरीत राज्यात सध्या चांगल्या पावसासाठी प्रभावी हवामान प्रणाली सक्रिय नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पुढील 4-5 दिवस राज्यात कुठेही मोठा पावसाचा अलर्ट नाही.

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली