AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : RR vs CSK | 21 वर्षाच्या पोराने सर जडेजाला रिव्हर्सशीपने मारला कडक सिक्सर, एकट्याने चेन्नईला फोडलं!

21 वर्षाच्या पोराने चेन्नईच्या गोलंदाजांचा घाम काढला. आपल्या खेळीमध्ये जयस्वाल याने 8 चौकार आणि 4 षटकार मारले. यामधील एक सिक्सर यशस्वीने रविंद्र जडेजाला मारला.

Video : RR vs CSK | 21 वर्षाच्या पोराने सर जडेजाला रिव्हर्सशीपने मारला कडक सिक्सर, एकट्याने चेन्नईला फोडलं!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Apr 27, 2023 | 10:19 PM
Share

मुंबई : राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सुरू असलेल्या सामन्यामध्ये राजस्थान संघाने 202 धावा केल्या आहेत.  राजस्थानकडून सलामीवीर यशस्वी जयस्वाल याने सर्वाधिक 77 धावांची खेळी केली.  21 वर्षाच्या पोराने चेन्नईच्या गोलंदाजांचा घाम काढला. आपल्या खेळीमध्ये जयस्वाल याने 8 चौकार आणि 4 षटकार मारले. यामधील एक सिक्सर यशस्वीने रविंद्र जडेजाला मारला.

पाहा व्हिडीओ

सातव्या ओव्हरमध्ये जयस्वालने जडेजाला रिव्हर्सशीप शॉट मारत सिक्सर मारला. त्यावेळी बटलर मैदानावर होता. त्याला चेन्नईच्या गोलंदाजांनी  बांधून ठेवलं होतं. मात्र जयस्वालने कोणतही दडपण न घेता मोठी खेळी केली.

चेन्नईने जोस बटलर 27 धावा , संजू सॅमसन 17 धावा, शिमरन हेटमायर 8 धावा यांना मोठी  खेळी करू दिली नाही. मात्र यशस्वी जयस्वाल 77 धावा आणि ध्रुव जुरेल 34 आणि पडिक्कलनेही नाबाद 27 धावा करत संघाला 200 धावांचा टप्पा पार करून दिला.

राजस्थान रॉयल्स संघाचे महत्त्वाचे खेळाडू बाद झाल्यावर संघ 170 धावा करण्यातही यशस्वी ठरतील की नाही शंका होती. मात्र आधी जयस्वाल त्यानंतर ध्रुव जुरेल आणि पडिक्कल यांनी चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई केली. पडिक्कलनेही शेवटला येत आक्रमक फटकेबाजी करत संघाला 200 धावांचा टप्पा ओलांडण्यास मदत केली.

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेवन): यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सैमसन (w/c), शिमरोन हेटमेयर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, एडम ज़म्पा, संदीप शर्मा, युजवेंद्र चहल

चेन्नई सुपर किंग्स (प्लेइंग इलेवन): ऋुतुराज गायकवाड, डेवॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोइन अली, अंबाती रायडू, शिवम दूबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कप्तान), मथीशा पथिराना, तुषार देशपांडे, महेश तीक्ष्णा

Follow Us
बारावीत 35%... MHT-CET मध्ये 100 पर्सेंटाईल? महाराष्ट्रात...
CET Exam Scam | बारावीत 35%... MHT-CET मध्ये 100 पर्सेंटाईल? महाराष्ट्रात महाघोटाळ्याच्या आरोपांनी खळबळ!
अजित पवारांसोबतचा जूना फोटो, खास कॅप्शन; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट
अजित पवारांसोबतचा जूना फोटो, खास कॅप्शन; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट चर्चेत
जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण?
CJP Protest | जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण? जाणून घ्या संपूर्ण कहाणी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय, सर्व मंत्र्यांना बोलवल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय, सर्व मंत्र्यांना बोलवलं अन् दीड वर्षाचा... काय घडलं?
शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत जाणार का? राऊतांनी स्पष्टच सांगितलं
Sanjay Raut on NCP | शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत जाणार का? राऊतांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
आता मुख्यमंत्र्यांना मान्य करावंच; पत्रकार परिषदेत संजय राऊत संतापले
आता मुख्यमंत्र्यांना मान्य करावंच; पत्रकार परिषदेत संजय राऊत संतापले, थेट...
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून
मोठी बातमी! कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून कोर्टात याचिका दाखल
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग