AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CSK vs RR: चेन्नई सुपर किंग्सच्या खेळाडूने केली मोठी चूक, ऋतुराज गायकवाडने सामना सुरु असताना केलं बाहेर

आयपीएल 2024 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सने राजस्थान रॉयल्सला पराभवाची धूळ चारली. या सामन्यातील विजयासह 14 गुणांसह तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. हा सामना राजस्थान रॉयल्ससाठी खूपच महत्त्वाचा होता. या सामन्यात एक चूक चांगलीच महागात पडली असती. याचा अंदाज ऋतुराज गायकवाडला होता.

CSK vs RR: चेन्नई सुपर किंग्सच्या खेळाडूने केली मोठी चूक, ऋतुराज गायकवाडने सामना सुरु असताना केलं बाहेर
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 12, 2024 | 9:18 PM
Share

आयपीएल 2024 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सला दोन्ही सामने जिंकणं महत्तवाच होतं. आता राजस्थानला पराभूत करण्यात यश आलं आहे. आता उर्वरित एका सामन्यात विजय मिळवत प्लेऑफमध्ये स्थान मिळणार आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्धचा सामना किती महत्त्वाचा होता हे अधोरेखित होतं. राजस्थान विरुद्धचा सामना गमावला असता तर स्पर्धेतून आव्हान संपुष्टात येऊ शकलं असतं. गोलंदाजांची उणीव चेन्नई सुपर किंग्सला प्रकर्षांने भासत आहे. मतीशा पथिराना बाहेर असल्याने महीश तीक्षणाला महत्त्वाच्या सामन्यात संधी दिली गेली. तीक्षणाकडून संघाला बऱ्याच अपेक्षा होत्या. पथिरानासारखी गोलंदाजी आणि फिल्डिंग करेल अशी आला होती. तीक्षणाने गोलंदाजी तर चांगली केली. पण फिल्डिंगमध्ये एक चूक करून बसला. तीक्षणाने महत्त्वाच्या सामन्यात फॉर्मात असलेल्या फलंदाजाचा कॅच सोडला. प्रथम फलंदाजी करत असलेल्या राजस्थानच्या संघाने 8 षटकात 49 धावा केल्या होत्या. संजू सॅमसन आणि रियान पराग डाव सावरून खेळत होते.

रवींद्र जडेजाकडे 12वं षटक सोपवलं होतं. या षटकात रियान परागने उत्तुंग फटका मारला. मात्र जडेजाच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला. सीमारेषेवर उभ्या असलेल्या तीक्षणाच्या हाती सोपा झेलो होता. मात्र त्याला हा झेल पकडण्यात अपयश आलं. त्याने हा झेल पकडण्याचा दोन तीन वेळा प्रयत्न केला. पण त्याला काही यश आलं नाही. त्यानंतर त्याच्या षटकांचा कोटा जसा पूर्ण झाला. तसं कर्णधार ऋतुराज गायकवाडने त्याला बाहेर केलं आणि समीर रिझवी फिल्डिंगसाठी बोलवलं.

महीश तीक्षणा आधीपासूनच सीमेवर झेल सोडण्यात प्रसिद्ध आहे. त्याने हा झेल सोडल्यानंतर चेन्नईच्या फॅन्सनी आपला राग सोशल मीडियावर व्यक्त करण्यास सुरुवात केली. तीक्षणाचं संघात असणं अनेकाना रुचलं नाही. तर काही जणांनी संघात त्याला जागाच द्यायला नको होती असा सूर आळवला आहे.

तीक्षणाने रियान परागचा झेल सोडला तेव्हा राजस्थानचा संघ 67 धावांवर होता. रियान पराग 15 धावांवर खेळत होता. त्यानंतर संजू सॅमसन बाद झाला. संथ खेळपट्टीवरही रियान पराग तग धरून राहिला. त्याने 35 चेंडूत 47 धावा केल्या. तसेच राजस्थानला 20 षटकात 141 धावा करता आल्या. तीक्षणाने या सामन्यात 4 षटकं टाकली आणि 28 धावा केल्या. तसेच एकही विकेट घेता आली नाही.

Follow Us
राहुल गांधींकडून पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित
राहुल गांधींकडून पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित; मोदींवर दुहेरी भूमिकेचा आरोप
छात्रों की गूंज कार्यक्रमात प्रत्येकी ३५ हजार रुपये वाटप
नवनाथ बन यांचा दावा, छात्रों की गूंज कार्यक्रमात प्रत्येकी ३५ हजार रुपये वाटप
चित्रा वाघ यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
चित्रा वाघ यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल:
कार्यकर्ता तसेच विद्यार्थिनींनी साकारली राहुल गांधींची सुंदर रांगोळी
राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याला उस्फुर्त प्रतिसाद! कार्यकर्ता तसेच विद्यार्थिनींनी सकारली सुंदर रांगोळी
पुण्यात राहुल गांधींना मुस्लिम तरुणांकडून खास भेट...
कार्यकर्त्यांचा उत्साह! पुण्यात राहुल गांधींना मुस्लिम तरुण देणार छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती
पुण्यात राहुल गांधींची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक; महाराष्ट्रातील राजकारणाब
पुण्यात राहुल गांधींची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक; महाराष्ट्रातील राजकारणाबाबत चर्चा, अगामी काळात...
राहुल गांधींचं पुण्यात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, कार्यक्रमाची...
राहुल गांधींचं पुण्यात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, कार्यक्रमाची जय्यत तयारी
सणासुदीपूर्वी चंद्रपूरमध्ये साखरेचे भाव गगनाला, सर्वसामान्यांचे बजेट
सणासुदीपूर्वी चंद्रपूरमध्ये साखरेचे भाव गगनाला, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले
देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप: राहुल गांधींच्या...
देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप: राहुल गांधींच्या प्रचारासाठी इन्फ्लुएंसर्सना तब्बल...
Abdul Sattar: मराठा आरक्षणावर अब्दुल सत्तारांचे मोठे विधान;
Abdul Sattar: मराठा आरक्षणावर अब्दुल सत्तारांचे मोठे विधान; जरांगेंना चर्चेतून न्याय देणार