अकोल्याची पोरं सुस्साट, दोन क्रिकेटपटूंची IPL मध्ये एंट्री

| Updated on: Feb 14, 2022 | 10:07 AM

जगभरातली सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग म्हणजे आयपीएल (Indian Premier League). गेल्या दोन दिवसांपासून बंगळुरुमध्ये (Banglore) या स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव (TATA IPL 2022 Mega Auction) सोहळा पार पडला. एकूण 590 खेळाडूंची या मेगा ऑक्शनसाठी निवड झाली होती. त्यातल्या 203 खेळाडूंची फ्रेंचायजींनी खरेदी केली.

अकोल्याची पोरं सुस्साट, दोन क्रिकेटपटूंची IPL मध्ये एंट्री
Atharva Taide, Darshan Nalkande
Follow us on

अकोला : जगभरातली सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग म्हणजे आयपीएल (Indian Premier League). गेल्या दोन दिवसांपासून बंगळुरुमध्ये (Banglore) या स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव (TATA IPL 2022 Mega Auction) सोहळा पार पडला. एकूण 590 खेळाडूंची या मेगा ऑक्शनसाठी निवड झाली होती. त्यातल्या 203 खेळाडूंची फ्रेंचायजींनी खरेदी केली. यंदा आयपीएलमध्ये आठ नाही, तर 10 संघ (IPL Teams) मैदानावर खेळताना दिसणार आहेत. सर्वच फ्रेंचायझींना 25 खेळाडू खरेदी करता येणार होते. त्यांच्याकडे पर्समध्ये 90 कोटी रुपये होते. या फ्रेंचायझींनी जगभरातले क्रिकेटपटू आपल्या संघाकडून खेळावे यासाठी कोट्यवधी रुपये मोजले. या आयपीएल लिलावात महाराष्ट्राचे अनेक क्रिकेटपटू दिसले. त्यातल्या काहींची फ्रेंचायझींनी खरेदी केली. तर काही खेळाडू अनसोल्ड (कोणीही खरेदी केलं नाही) राहिले. दरम्यान, या लिलावात अकोल्याच्या दोन क्रिकेटपटूंनी सर्वांचं लक्ष वेधलं.

अकोला क्रिकेट क्लबच्या दोन खेळाडूंची आयपीएल 2022 मध्ये एन्ट्री झाली आहे. अष्टपैलू खेळाडू दर्शन नळकांडे याला 20 लाख रुपयांच्या बेस प्राईसवर गुजरात टायटन्सने आपल्या संघात घेतलं. तर आक्रमक फलंदाज अथर्व तायडे याला किंग्ज इलेव्हन पंजाबने 20 लाख रुपयांच्या बेस प्राईसमध्ये खरेदी केलं. या दोन्ही खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

पंजाब किंग्सने खरेदी केलेले खेळाडू

  • शिखर धवन- 8.25 कोटी रुपये
  • कगिसो रबाडा- 9.25 कोटी रुपये
  • जॉनी बेअरस्टो – 6.75 कोटी रुपये
  • राहुल चहर – 5.25 कोटी रुपये
  • शाहरुख खान – 9 कोटी रुपये
  • हरप्रीत ब्रार – 3.8 कोटी रुपये
  • प्रभसिमरन सिंग – 60 लाख रुपये
  • जितेश शर्मा – 20 लाख रुपये
  • इशान पोरेल – 25 लाख रुपये
  • लियाम लिव्हिंगस्टोन – 11.50 कोटी रुपये
  • ओडिन स्मिथ – 6 कोटी रुपये
  • संदीप शर्मा – 50 लाख रुपये
  • राज बावा – 2 कोटी रुपये
  • ऋषी धवन – 55 लाख रुपये
  • वैभव अरोरा – 2 कोटी रुपये
  • अंश पटेल – 20 लाख रुपये
  • हृतिक चॅटर्जी – 20 लाख रुपये
  • बलतेज धांडा – 20 लाख रुपये
  • बेनी हॉवेल – 50 लाख रुपये
  • भानुका राजपक्षे – 50 लाख रुपये
  • अथर्व तायडे – 20 लाख रुपये
  • नॅथन एलिस – 75 लाख रुपये
  • प्रेरक मंकड – 20 लाख रुपये

गुजरात टायटन्सने खरेदी केलेले खेळाडू

  • हार्दिक पंड्या – 15 कोटी रुपये
  • राशिद खान – 15 कोटी रुपये
  • लोकी फर्ग्युसन – 10 कोटी रुपये
  • राहुल तेवतिया – 9 कोटी रुपये
  • शुभमन गिल – 8 कोटी रुपये
  • मोहम्मद शमी – 6.15 कोटी रुपये
  • जेसन रॉय – 2 कोटी रुपये
  • आर साई किशोर – 3 कोटी रुपये
  • अभिनव मनोहर – 2.6 कोटी रुपये
  • डॉमिनिक ड्रेक्स – 1.10 कोटी रुपये
  • जयंत यादव – 1.70 कोटी रुपये
  • विजय शंकर – 1.40 कोटी रुपये
  • दर्शन नळकांडे – 20 लाख रुपये
  • नूर अहमद – 30 लाख रुपये
  • यश दयाल – 3.20 कोटी रुपये
  • अल्झारी जोसेफ – 2.40 कोटी रुपये
  • प्रदीप सांगवान – 20 लाख रुपये
  • वृद्धीमान साहा – 1.90 कोटी रुपये
  • मॅथ्यू वेड – 2.40 कोटी रुपये
  • गुरकीरत सिंग – 50 लाख रुपये

इतर बातम्या

खेळाडूंची किंमत वाढवतो, पण घेत तर नाही! कोणंय हा, जो खाली करतोय प्रतिस्पर्ध्यांची कोटींची पर्स?

DC IPL 2022 Auction: ‘त्या’ माणसाने किंमत वाढवून दुसऱ्यांची पर्स रिकामी केली पण स्वत: कमी बजेटमध्ये बांधला दिल्लीचा उत्तम संघ