AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

David warner IPL 2021 Sunrisers Hydrabad Team Player : आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी डेव्हिड वॉर्नर सज्ज, हैदराबादला विजेतेपद मिळवून देण्यासाठी उत्सुक

डेव्हिड वॉर्नर आयपीएलच्या सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hydrabad) या संघाकडून खेळतो तसंच त्याच्या खांद्यावर हैदराबाद संघाची धुरा देखील आहे. अतिशय यशस्वीपणे तो हैदराबादची धुरा सांभाळतोय. | David Warner Sunrisers Hydrabad

David warner IPL 2021 Sunrisers Hydrabad Team Player : आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी डेव्हिड वॉर्नर सज्ज, हैदराबादला विजेतेपद मिळवून देण्यासाठी उत्सुक
David Warner Cricket Career
| Updated on: Mar 24, 2021 | 7:24 PM
Share

मुंबई : डेव्हिड वॉर्नर (david warner), ऑस्ट्रेलियाचा आक्रमक बॅट्समन. आपल्या बॅटिंगने त्याने जागतिक क्रिकेट विश्वात आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय. भरवशाचा आणि सातत्याने धावा करणारा बॅट्समन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. डावखुऱ्या हाताने मैदानाच्या चारही कोपऱ्यात फटके खेळण्यात तो माहिर आहे. ओपनिंगला येऊन सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये प्रतिस्पर्धी संघावर हल्ला करण्यात आणि धावा जमवण्यासाठी त्याला ओळखलं जातो. डेव्हिड वॉर्नर आयपीएलच्या सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hydrabad) या संघाकडून खेळतो तसंच त्याच्या खांद्यावर हैदराबाद संघाची धुरा देखील आहे. अतिशय यशस्वीपणे तो हैदराबादची धुरा सांभाळतोय. त्याच्या क्रिकेट करिअरवर आपण नजर टाकूया… (David warner IPL 2021 SH Team Player Profile Stats ICC Ranking Photos Videos Australian Cricket Players Latest News in Marathi)

डेव्हिड वॉर्नरचं टेस्ट, वनडे आणि टी ट्वेन्टीत पदार्पण कधी?

कसोटी पदार्पण- डेव्हिड वॉर्नरने न्यूझीलंडविरुद्ध डिसेंबर 2011 साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय. वनडे पदार्पण – डेव्हिड वॉर्नरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जानेवारी 2009 मध्ये वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय. टी ट्वे्न्टी पदार्पण- डेव्हिड वॉर्नरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जानेवारी 2009 मध्ये टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय.

डेव्हिड वॉर्नरची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आकडेवारी

फॉरमॅट   मॅच     इनिंग     रन्स       सर्वाधिक रन्स     स्ट्राईक रेट कसोटी    86      159       7311         335*                72.68 वन डे    128       126       5455        179                  95.53 टी ट्वेन्टी  81         81         2265       100*                139.72 IPL      142       142        5254       126                   141.54

डेव्हिड वॉर्नरने आतापर्यंत 86 मॅचेसमध्ये 72.68 च्या स्ट्राईक रेटने 7 हजार 311 रन्स केले आहेत. त्यातील 335 ही त्याची सर्वाधिक धावसंख्या ठरली आहे. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत त्याने 128 मॅचेसमध्ये 95.53 च्या सरासरीने 5 हजार 455 रन्स केले आहेत. त्यातील 179 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या ठरलीय. दुसरीकडे टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत 81 मॅच खेळल्या आहेत. त्यात 139.72 च्या स्ट्राईट रेटने त्याने 2 हजार 265 धावा फटकावल्या आहेत. त्यात नाबाद 100 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. तर आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत 142 सामन्यांत 141.54 च्या स्ट्राईक रेटने 5हजार 254 रन्स केले आहेत. त्यात 126 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

वॉर्नरच्या नेतृत्वात 2016 मध्ये विजेतेपद

हैदराबादला आतापर्यंत एकदाच आयपीएलचं विजेतेपद पटकावण्यात यश आले होते. हैदराबादने 2016 मध्ये वॉर्नरच्या नेतृत्वात ही कामगिरी केली होती. हैदराबादने गेल्या मोसमात टॉप 3 मध्ये एंट्री मारली होती. मात्र क्वालिफायर 2 सामन्यात दिल्लीकडून पराभव झाल्याने हैदराबादचा प्रवास तिसऱ्या क्रमांकावर संपला होता. हैदराबादने गेल्या मोसमात एकूण साखळी फेरीतील 14 सामन्यांमधून 7 सामन्यात विजय मिळवला होता. त्यामुळे या मोसमात गत मोसमापेक्षा आणखी दमदार कामगिरी करण्याचा मानस हैदराबादचा असणार आहे.

आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी Sunrisers Hyderabad चा संघ

डेव्हिड वॉर्नर, राशिद खान, मोहम्‍मद नबी, अभिषेक शर्मा, रिद्धिमान साहा, बासिल थंपी, जेसन होल्‍डर, भुवनेश्‍वर कुमार, खलील अहमद, विराट सिंह, टी. नटराजन, अब्‍दुल समद, केन विलियमसन, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, जॉनी बेयरस्‍टो, मनीष पांडे, विजय शंकर, मिचेल मार्श, सिद्धार्थ कौल, प्रियम गर्ग, श्रीवत्‍स गोस्‍वामी, केदार जाधव, मुजीब उर रेहमान आणि जगदीश सुचिथ

आयपीएलचा थरार 9 एप्रिलपासून…

आयपीएलच्या 14 व्या हंगामाची सुरुवात 9 एप्रिलपासून होणार आहे. या 14 व्या मोसमाचा थरार एकूण 51 दिवस रंगणार आहे. 9 एप्रिल ते 30 मे पर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. या मोसमातील सलामीचा सामना गत विजेच्या मुंबई इंडियन्स (Muambai Indians) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royals challengers banglore) यांच्यात खेळवण्यात येणार आहे.

हे ही वाचा :

IPL Sunrisers Hyderabad Team 2021 | मराठमोळा केदार जाधव हैदराबादकडून खेळणार, पाहा संपूर्ण टीम

IPL Auction 2021 Highlights | ख्रिस मॉरिसला सर्वात मोठी रक्कम, एकूण 57 खेळाडूंचा लिलाव

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.