DC vs LSG, IPL 2022: केएल राहुलने टॉस जिंकला, लखनौची पहिली बॅटिंग

DC vs LSG, IPL 2022: इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत आज डबल हेडरचे सामने आहेत. आज रविवार आहे. पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्समध्ये (DC vs LSG) आहे.

DC vs LSG, IPL 2022:  केएल राहुलने टॉस जिंकला, लखनौची पहिली बॅटिंग
dc vs lsg
| Updated on: May 01, 2022 | 3:26 PM

DC vs LSG, IPL 2022: इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत आज डबल हेडरचे सामने आहेत. आज रविवार आहे. पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्समध्ये (DC vs LSG) आहे. लखनौचा कॅप्टन केएल राहुलने (KL Rahul) टॉस जिंकला आहे. त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. यंदाच्या सीजनमध्ये ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सच प्रदर्शन खास नाहीय. आठ पैकी चार सामन त्यांनी जिंकले असून ते पॉइंटस टेबलमध्ये सहाव्या स्थानावर आहेत. लखनौची टीम या सीजनमध्ये नऊ सामने खेळली आहे. त्यांनी सहा सामन्यात विजय मिळवला आहे. लखनौने मागच्या सामन्यात पंजाब किंग्सला हरवलं होतं. दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाइट रायडर्सला पराभूत केलं होतं.

दिल्लीला विजय आवश्यक

लखनौ सुपर जायंट्सचा संघ पॉइंटस टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. आजच्या सामन्यात दोन पॉइंटस मिळवून ते दुसऱ्या स्थानावर पोहोचण्याचा प्रयत्न करतील. दिल्लीला प्लेऑफच्या दिशेने भक्कम पाऊल टाकण्यासाठी आजच्या सामन्यात विजय आवश्यक आहे. दिल्लीच्या खात्यात चार विजय आणि चार पराभव आहे.

लखनौची Playing -11
केएल राहुल (कॅप्टन), क्विंटन डि कॉक, दीपक हुड्डा, मार्कस स्टॉयनिस, आयुष बदोनी, कृणाल पंड्या, कृष्णप्पा गौतम, जेसन होल्डर, दुष्मंता चमीरा, मोहसीन खान, रवी बिश्नोई,

दिल्लीची Playing -11
ऋषभ पंत (कॅप्टन), पृथ्वी शॉ, डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, ललित यादव, रोव्हमॅन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, चेतन सकारिया,