AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022: टीम मधल्या फलंदाजांवर KL Rahul ने काढला राग, ‘असं खेळतात का क्रिकेट?’

KL Rahul IPL 2022: खरंतर विजयानंतर कॅप्टनने खुश झालं पाहिजे. पण राहुलच्या बाबतीत उलट झालं, तो भडकला. मॅच संपल्यानंतर प्रेझेंटेशनच्यावेळी त्याला संघाच्या कामगिरीबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

IPL 2022: टीम मधल्या फलंदाजांवर KL Rahul ने काढला राग, 'असं खेळतात का क्रिकेट?'
KL RahulImage Credit source: BCCI
| Updated on: Apr 30, 2022 | 4:15 PM
Share

मुंबई: लखनौ सुपर जायंट्सने काल पंजाब किंग्स विरुद्धचा (LSG vs PBKS) सामना सहज जिंकला. IPL 2022 मध्ये सहावा विजय मिळवताना, पॉइंटस टेबलमध्येही त्यांनी झेप घेतली. पण तरीही संघाच्या कामगिरीवर कॅप्टन केएल राहुल (KL Rahul) खूश नाहीय. केएल राहुलला आपल्या संघाकडून भरपूर अपेक्षा आहेत. फक्त एवढ्याने भागणार नाही, असं राहुलचं मत आहे. मॅच संपल्यानंतर राहुलच्या मनातला राग बाहेर निघाला. लखनौच्या टीममधील प्रत्येक फलंदाजावर राहुलने आपला राग व्यक्त केला. त्यांच्या खेळण्याची पद्धत आणि अनुभवावर राहुलने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. आम्ही जिंकलो. पण चांगलं क्रिकेट खेळलो नाही, असंच राहुलला म्हणायचं होतं.

पुण्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात लखनौने पंजाब किंग्सवर 20 रन्सनी विजय मिळवला. लखनौने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात आठ बाद 153 धावा केल्या. पंजाब किंग्सची टीम 154 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना निर्धारित 20 षटकात आठ बाद 133 धावा केल्या.

खरंतर विजयानंतर कॅप्टनने खुश झालं पाहिजे. पण राहुलच्या बाबतीत उलट झालं, तो भडकला. मॅच संपल्यानंतर प्रेझेंटेशनच्यावेळी त्याला संघाच्या कामगिरीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्याने हे उत्तर दिलं.

केएल राहुलने फलंदाजांना सुनावलं

“पहिल्या इनिंगनंतर माझ्या मनात संताप होता. आम्ही खराब फलंदाजी केली. संघातील अनुभवी फलंदाजांकडून अशी अपेक्षा नव्हती. आम्ही खूप खराब फलंदाजी केली. आम्ही 160 धावा धावफलकावर लावू असं वाटलं होतं. पण काहींनी खराब फटके खेळले, काही रनाऊट झाले. टीमच्या मधल्याफळीने निराश केलं” असं राहुल म्हणाला.

गोलंदाजांच केलं कौतुक

फलंदाजांना केएल राहुलने सुनावलं. पण गोलंदाजांच त्याने कौतुक केलं. “हा विजय संपूर्णपणे आमच्या गोलंदाजांचा आहे. त्यांच्यामुळे आम्हाला धावांचा बचाव करता आला व विजय मिळवण्यात आम्ही यशस्वी ठरलो” असं त्याने सांगितलं.

14 धावांमध्ये पाच विकेट

पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात दुसऱ्या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी झाली. पण त्या व्यतिरिक्त डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. चार ओव्हर्समध्ये पाच विकेट 14 धावांमध्ये पडल्या. लखनौच्या गोलंदाजांनी आपल्या दमदार कामगिरीने फलंदाजांची ढिसाळ कामगिरी झाकली.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.