
आयपीएलच्या 18 व्या मोसमातील (IPL 2025) चौथ्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सने लखनौ सुपर जायंट्सवर 1 विकेट राखून विजय मिळवला. दोन्ही संघांचा हा या मोहिमेतील पहिला सामना होता. पण या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सरशी मारली. पॉवर प्लेमध्ये झटपट विकेटच गमवल्यानंतर हा सामना लखनौच्या पारड्यात झुकला होता. पण आशुतोष शर्माने इम्पॅक्ट प्लेयर म्हणून छाप सोडली. लखनौ सुपर जायंट्सने विजयासाठी 210 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान लखनौ सुपर जायंट्सने 9 गडी गमवून 19.3 षटकात पूर्ण केलं. आशुतोष शर्माने या सामन्यात 31 चेंडूत नाबाद 66 धावांची खेळी केली आणि विजय मिळवून दिला. चार चेंडूत पाच धावांची गरज असताना उत्तुंग षटकार मारला आणि विजय मिळवून दिला.
अशुतोष शर्माने गेलेला सामना खेचून आणला आणि दिल्ली कॅपिटल्सला पहिल्या सामन्यात विजय मिळवून दिला. 1 विकेट राखून हा विजय मिळवला. शेवटच्या षटकात 6 चेंडूत 6 धावांची गरज होती. ऋषभ पंतने शहबाज अहमदच्या हाती चेंडू सोपवला. शेवटची विकेट हाती होती. मोहित शर्मा स्ट्राईकला होता त्यामुळे धाकधूक वाढली होती. पहिला चेंडू खेळताना फसला, पण ऋषभ पंतने स्टंपिंगची संधी सोडली. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चोरटी धाव घेताना रनआऊटही मिस झाला. अखेर अशुतोष शर्माला स्ट्राईक मिळाली आणि तिसऱ्या चेंडूवर षटकार मारून विजय मिळवून दिला.
मिचेल स्टार्क 2 धावा करुन आऊट झाला आहे. दिल्लीने आठवी विकेट गमावली आहे. आता लखनौ विजयापासून 2 विके्टस दूर आहे.
दिल्लीने सातवी विकेट गमावली आहे. विपराज निगम 15 बॉलमध्ये 39 रन्स केल्या.
दिल्लीने 210 धावांचा पाठलाग करताना 113 धावांवर सहावी विकेट गमावली. त्यामुळे दिल्ली पराभवाच्या छायेत होती. मात्र दिल्लीच्या आशुतोष शर्मा आणि विपराज निगम या दोघांनी नाबाद अर्घशतकी भागीदारी केलीय. दिल्लीने या भागीदारीसह सामन्यात कमबॅक केलं आहे.
लखनौने दिल्ला सहावा झटका दिला आहे. एम सिद्धार्थ याने ट्रिस्टन स्टब्स याला 34 धावांवर बोल्ड केलं.
दिल्लीचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. फाफ डु प्लेसीस 29 धावा करुन आऊट झाला. प्लेसीस आऊट झाल्यानंतर दिल्लीची स्थिती 5 बाद 65 अशी झालीय.
लखनौने दिल्लीला पावरप्लेमध्ये चौथा झटका दिला आहे. दिग्वेश राठी याने दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेल याला 22 धावांवर निकोलस पूरन याच्या हाती कॅच आऊट केलं.
लखनौने दिल्लीला तिसरा झटका दिला आहे. एम सिद्दार्थ याने समीर रिझवी याला 4 धावांवर आऊट केलं.
शार्दूल ठाकुरने लखनऊला अप्रतिम सुरुवात करुन दिली आहे. शार्दुलने दिल्लीला त्यांच्या डावातील पहिल्याच ओव्हरमध्ये 2 झटके दिले आहेत. शार्दुलने जेक फ्रेझर-मॅकगुर्क आणि अभिषेक पोरेल या दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
लखनौ सुपर जायंट्सने 20 षटकात 8 गडी गमवून 209 धावा केल्या आणि दिल्ली कॅपिटल्ससमोर विजयासाठी 210 धावांचं आव्हान दिलं आहे.
लखनौला सहावा झटका लागला आहे. शार्दूल ठाकुर झिरोवर रनआऊट झाला.
लखनौने पाचवी विकेट गमावली आहे. आयुष बदोनी 5 बॉलमध्ये 4 रन्स करुन आऊट झाला.
मिचेल स्टार्क याने स्फोटक आणि जोरदार फटकेबाजी करणाऱ्या निकोलस पूरन याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. स्टार्कने पूरला 75 रन्सवर क्लिन बोल्ड केलं.
लखनऊने तिसरी आणि मोठी विकेट गमावली आहे. ऋषभ पंत सहाव्या बॉलवर एकही धाव न करता माघारी परतला. कुलदीप यादवने ऋषभ पंतला आऊट केलं.
निकोलस पूरन याने डावातील 13 व्या ओव्हरमध्ये एकूण 28 धावा केल्या. पूरनने ट्रिस्टन स्टब्स याच्या बॉलिंगवर या धावा केल्या. ट्रिस्टनने पहिला बॉल डॉट टाकला. त्यानंतर निकोलसने सलग 4 सिक्स ठोकले. त्यानंतर पूरनने सहाव्या बॉलवर फोर लगावला.
मुकेश कुमार याने निकोलस पूरन-मिचेल मार्श सेट सेट जोडी फोडली आहे. मुकेशने मिचेल मार्श याला 72 धावांवर आऊट केलं.
लखनौ सुपर जायंट्सने दिल्ली विरुद्ध 11 ओव्हरमध्ये 1 विकेट्स गमावून 125 धावा केल्या आहेत. निकोलस पूरन 41 आणि मिचेल मार्श 65 धावांवर नाबाद खेळत आहेत.
दिल्लीने लखनौला पहिला झटका दिला आहे. विपराज निगम याने एडन मारक्रम याला 15 धावांवर मिचेल स्टार्क याच्या हाती कॅच आऊट केलं.
दिल्ली विरुद्ध लखनौ सामन्याला सुरुवात झाली आहे. लखनऊकडून एडन मारक्रम आणि मिचेल मार्श सलामी जोडी मैदानात आली आहे.
लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, आयुष बडोनी, ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हिड मिलर, प्रिन्स यादव, दिग्वेश राठी, शाहबाज अहमद, शार्दूल ठाकुर आणि रवी बिश्नोई.
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : जेक फ्रेझर-मॅकगुर्क, फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), समीर रिझवी, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा आणि मुकेश कुमार.
दिल्ली कॅपिट्ल्सने टॉस जिंकला आहे. कॅप्टन अक्षर पटेल याने लखनौविरुद्ध फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.
दिल्ली विरुद्ध लखनौ सामन्याला साडे सात वाजता सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे. टॉससाठी दोन्ही कर्णधार अक्षर पटेल आणि ऋषभ पंत मैदानात येणार आहेत.
दिल्ली कॅपिटल्स संघ : अक्षर पटेल (कर्णधार), जेक फ्रेझर-मॅकगर्क, फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल, केएल राहुल (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मुकेश कुमार, टी नटराजन, करुण नायर, मोहित शर्मा, दुष्मंथा चमीरा, अजय जाधव मंडल, दर्शन नळकांडे, समीर रिझवी, डोनोवन फरेरा, त्रिपुराण विजय, मानवंथ कुमार एल, विपराज निगम आणि माधव तिवारी.
लखनौ सुपर जायंट्स संघ: अर्शीन कुलकर्णी, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), निकोलस पूरन, आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, आरएस हंगरगेकर, रवी बिश्नोई, शमर जोसेफ, आकाश दीप, शाहबाज अहमद, मणिमरन सिद्धार्थ, आकाश महाराज सिंग, एडन मार्कराम, आवेश खान, हिम्मत सिंग, मॅथ्यू ब्रेट्झके, आर्यन जुयाल, युवराज चौधरी, मयंक यादव, प्रिन्स यादव आणि दिग्वेश राठी.
आयपीएलच्या 18 व्या मोसमातील चौथ्या सामन्यात आज (24 मार्च) दिल्ली विरुद्ध लखनौ भिडणार आहेत. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे.