
केएल राहुल याने बुधवारी 22 एप्रिलला लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध स्फोटक खेळी करत दिल्लीला 8 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवून दिला. केएलने आपल्या माजी संघाविरुद्ध खेळताना चौफेर फटकेबाजी केली. केएलने लखनौ टीममधून करारमुक्त झाल्यानंतर त्यांच्याच घरच्या मैदानात 3 सिक्स आणि 3 फोरसह नाबाद विजयी खेळी साकारली. केएलने दिल्लीच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. केएलची खेळी पाहता लखनौचे मालक संजीव गोयंका हे पाहतच राहिले.
केएल आयपीएल 2024 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सचं नेतृत्व करत होता. मात्र केएलसाठी 17 वा हंगाम फार आव्हानात्मक राहिला. संजीव गोयंका यांनी तेव्हा केएलला हैदराबादविरुद्धच्या मोठ्या पराभवानंतर भर मैदानातच सुनावलं होतं. त्यामुळे केएल आणि संजीव गोयंका यांच्यातील संबंध ताणले गेले होते. इतकंच हाय तर लखनौने त्यानंतर केएलला कायम न ठेवता करारमुक्त केलं होतं. त्यानंतर दिल्ली कॅपिट्ल्सने केएलला आपल्यासोबत घेतलं. त्यानंतर आता केएल दिल्लीसाठी मॅचविनरची भूमिका बजावत आहे. केएलने लखनौविरुद्ध मिड विकेटवरुन खणखणीत सिक्स ठोकून दिल्लीला विजयी केलं. केएलने 42 बॉलमध्ये नॉट आऊट 57 रन्स केल्या.
केएल राहुल याने सामन्यानंतर संजीव गोयंका यांच्याकडे दुर्लक्ष केलं. सामन्यानंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये हस्तांदोलन झालं. त्यानंतर गोयंका यांनी केएलसह हस्तांदोलन केलं आणि बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र केएल हस्तांदोलन करुन गोयंका यांच्याकडे दुर्लक्ष करुन पुढे निघून गेला. गोयंका यांना केएलसह काही तरी बोलायचं होतं. मात्र गोयंका यांच्याकडून गेल्या मोसमात त्याला मिळालेली वागणूक त्याच्या चांगलीच लक्षात होती. केएलने गोयंका यांना कोणतीही दाद दिली नाही आणि तो निघून गेला.
केएलने या सर्व प्रकारानंतर सोशल मीडियावरुन एक पोस्ट केली आहे. केएलने या पोस्टद्वारे लखनौच्या चाहत्यांना एक खास मेसेज दिला आहे. केएलने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. “लखनौमध्ये कमबॅक करणं नेहमी चांगलं वाटतं”, केएलने असं कॅप्शन दिलं आहे.
केएल राहुलची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल
Always good to be back in Lucknow. pic.twitter.com/NOC3Hg17oO
— K L Rahul (@klrahul) April 22, 2025
तसेच केएलने दिल्ली कॅपिट्ल्सच्या जर्सीसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. लखनौ सुपर जायंट्सच्या ड्रेसिंग रुपममधील वातावरण बरोबर नाही, असे संकेत केएलने टीमची साथ सोडताना दिले होते. मला नव्याने सुरुवात करायची आहे, असं केएलने गेल्या वर्षी एका मुलाखतीत म्हटलं होतं.