AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: आयपीएल प्लेऑफमध्ये जाण्याचं दिल्ली कॅपिटल्सचं सोपं गणित फिस्कटलं, अक्षर पटेल म्हणाला…

आयपीएल 2026 स्पर्धेतील 51वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात पार पडला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सला पराभवाचं पाणी पाजलं. या पराभवानंतर कर्णधार अक्षर पटेलने आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.

IPL 2026: आयपीएल प्लेऑफमध्ये जाण्याचं दिल्ली कॅपिटल्सचं सोपं गणित फिस्कटलं, अक्षर पटेल म्हणाला...
IPL 2026: आयपीएल प्लेऑफमध्ये जाण्याचं दिल्ली कॅपिटल्सचं सोपं गणित फिस्कटलं, अक्षर पटेल म्हणाला...Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 08, 2026 | 10:39 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत 51 सामन्यांचा खेळ संपला असून प्लेऑफचं चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. पण अजूनही कोणताही संघ प्लेऑफमध्ये जागा किंवा या शर्यतीतून बाद झाला नाही. कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना पार पडला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सला पराभवाची धूळ चारली. दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडी गमवून 142 धावा केल्या. या धावांचा पाठलाग कोलकाता नाईट रायडर्सने केला आणि विजय मिळवला. या स्पर्धेत सलग पराभवांची मालिका पाहिल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स जोरदार कमबॅक केलं आहे. हा स्पर्धेतील सलग चौथा विजय असून खात्यात 9 गुण जमा झाले आहेत. तर दिल्ली कॅपिटल्सची विजयानंतर पराभवाची मालिका सुरू आहे. इतकंच काय तर 16 गुणांचं गणितही चुकलं आहे. या पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने आपल्या भावना व्यक्त केल्या.

आयपीएल स्पर्धेत केकेआरकडून दिल्ली कॅपिटल्सचा पराभव झाला आणि कर्णधार अक्षर पटेल म्हणाला की, ‘धावा कमी पडल्या, फिरकी गोलंदाजांनी खूप चुका केल्या. खूप जास्त स्टेप-हिट्स दिल्या. आम्ही दोन तीन षटकांत चार पाच विकेट्स गमावल्या, त्यामुळे आमची लय बिघडली. आमच्याकडून चूक झाली तर येणाऱ्या फलंदाजांना अडचण येईल. एकापाठोपाठ एक विकेट्स पडल्यानंतर डाव सावरण्यासाठी आम्हाला एक-दोन षटके घ्यावी लागली. आम्हाला पुढच्या वर्षासाठी नियोजन करावे लागेल आणि पुढील दोन सामन्यांमध्ये खेळाडूंसोबत काम करावे लागेल.’

आयपीएल 2026 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सने 11 सामने खेळले आहेत. यापैकी चार सामन्यात विजय आणि 7 सामने गमावले आहे. त्यामुळे स्पर्धेत फक्त तीन सामने खेळायचे आहे. आता तीन सामन्यात विजय मिळवला तरी 14 गुण होतील. अशा स्थितीत प्लेऑफमध्ये संधी मिळवणं कठीण आहे. कारण 14 गुणांच्या शर्यतीत दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे संघ आहे. त्यामुळे टॉपला असलेल्या संघांनी 14 गुणांचं गणित जुळवलं तर तळाशी असलेल्या संघांना गाशा गुंडाळावा लागेल. कारण टॉपला असलेल्या पाच संघापैकी सनरायझर्स हैदराबादने 14, तर पंजाबने 13 गुण मिळवले आहेत. तर आरसीबी, राजस्थान आणि गुजरात टायटन्सचे 12 गुण आहेत.

Follow Us
29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? जरांगे पाटलांनी दिली सर्वात मोठी...
29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? जरांगे पाटलांनी दिली सर्वात मोठी अपडेट
आरोग्यमंत्री आबिटकरांचा मृत बालकांच्या पालकांशी संवाद, समिती स्थापन...
Amravati : आरोग्यमंत्री आबिटकरांचा मृत बालकांच्या पालकांशी संवाद, समिती स्थापन करण्याची घोषणा
मनोज जरांगेंच्या मागणीवर सरकार सकारात्मक? विखे पाटलांनी दिला सर्वात...
मनोज जरांगेंच्या मागणीवर सरकारा मोठा निर्णय? विखे पाटलांनी दिला सर्वात मोठा संकेत, दोन-तीन दिवसांत...
सीजेपीची मोठी घोषणा! येत्या 5 सप्टेंबरला थेट दिल्लीत...केंद्र सरकारचं
सीजेपीची मोठी घोषणा! येत्या 5 सप्टेंबरला थेट दिल्लीत...केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं!
रुपाली चाकणकरांच्या बदनामीवरून मोठी कारवाई; 19 जणांवर गुन्हा दाखल!
रुपाली चाकणकरांच्या बदनामीवरून मोठी कारवाई; सुषमा अंधारेंसह 19 जणांवर गुन्हा दाखल! लवकरच...
दिवाळीपर्यत साखरेचे दर शंभरी ओलांडणार? सरकारचा मोठा निर्णय...
Sugar Price Today : दिवाळीपर्यत साखरेचे दर शंभरी ओलांडणार? सरकारचा मोठा निर्णय...
पालिका आयुक्त अश्विनी भिडेंनी प्रकाश आंबेडकरांना भेट नाकाराली, नेमकं..
पालिका आयुक्त अश्विनी भिडेंनी प्रकाश आंबेडकरांना भेट नाकाराली, नेमकं कारण काय?
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी..
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी थेट खात्यावर पडणार?
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? जरांगेंसोबत चर्चा
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? मनोज जरांगेंसोबत सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा
आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं...
Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क...