DC vs PBKS Live Streaming : दिल्लीसमोर पंजाबचं आव्हान, सहाव्या विजयापासून रोखणार? सामना किती वाजता?

Delhi Capitals vs Punjab Kings IPL 2026 Live Scorecard : पंजाब किंग्स 19 व्या मोसमातील एकमेव अजिंक्य टीम आहे. त्यामुळे दिल्लीसमोर शनिवारी पंजाबची विजयी घोडदौड रोखण्याचं आव्हान असणार आहे.

DC vs PBKS Live Streaming : दिल्लीसमोर पंजाबचं आव्हान, सहाव्या विजयापासून रोखणार? सामना किती वाजता?
Delhi Capitals vs Punjab Kings IPL 2026 Preview
Image Credit source: PTI
| Updated on: Apr 25, 2026 | 3:40 AM

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात अर्धा टप्पा जवळपास पूर्ण होत आला आहे. त्यामुळे आता एकूण 10 संघात प्लेऑफमधील 4 जागांसाठी जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. स्पर्धेच्या 19 व्या मोसमात शनिवारी 25 एप्रिलला डबल हेडरचा थरार रंगणार आहे. या डबल हेडरमधील पहिल्या आणि हंगामातील 35 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा सातवा सामना असणार आहे. पंजाब या मोसमातील एकमेव अंजिक्य टीम आहे. त्यामुळे विजयात सातत्य राखण्यात अपयशी ठरणार्‍या दिल्लीसमोर पंजाबला रोखण्याचं अवघड आव्हान आहे. त्यामुळे दिल्ली पंजाबचा विजयरथ रोखण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दिल्ली विरुद्ध पंजाब सामना कधी?

दिल्ली विरुद्ध पंजाब सामना शनिवारी 25 एप्रिलला खेळवण्यात येणार आहे.

दिल्ली विरुद्ध पंजाब सामना कुठे?

दिल्ली विरुद्ध पंजाब सामना अरुण जेटली स्टेडियम, नवी दिल्ली इथे होणार आहे.

दिल्ली विरुद्ध पंजाब सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

दिल्ली विरुद्ध पंजाब सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 3 वाजता टॉस होईल.

दिल्ली विरुद्ध पंजाब सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

दिल्ली विरुद्ध पंजाब सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कद्वारे पाहायला मिळेल. तर लाईव्ह मॅच जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहता येईल.

दोन्ही संघांची कामगिरी

ताज्या आकडेवारीनुसार, पंजाब पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 आहे. पंजाबने आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत. पंजाबने या 6 पैकी 5 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर पंजाबचा केकेआर विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. पंजाबच्या खात्यात 11 गुण आहेत. तसेच पंजाबचा नेट रनरेट हा +1.420 असा आहे.

दिल्ली कॅपिट्ल्स पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानी आहे. दिल्लीने या हंगामात 6 पैकी 3 सामने जिंकलेत. तर दिल्लीने तितकेच सामने गमावलेत. तसेच दिल्लीचा नेट रनरेट हा -0.130 असा आहे.

दोन्ही संघ तुल्यबळ

दरम्यान यंदाच्या मोसमात पंजाबने आतापर्यंत सर्वोत्तम कामगिरी केली आहे. मात्र इतिहासातील आकडेवारी पाहता दिल्ली आणि पंजाब तुल्यबल असल्याचं आकड्यांवरुन स्पष्ट होतं. आतापर्यंत उभयसंघात एकूण 34 सामने खेळवण्यात आले आहेत. या 34 पैकी दिल्ली आणि पंजाबने प्रत्येकी 17-17 सामने जिंकलेत. त्यामुळे आता शनिवारी कोणता संघ आघाडी घेतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Follow Us