Cricket Captaincy | टीम इंडियाच्या 28 वर्षीय युवा खेळाडूकडे कर्णधारपदाची जबाबदारी, कोण आहे तो?

Captaincy | टीम इंडियातून गेली अनेक महिने बाहेर असलेल्या खेळाडूला बीसीसीआयने थेट कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे.

Cricket Captaincy | टीम इंडियाच्या 28 वर्षीय युवा खेळाडूकडे कर्णधारपदाची जबाबदारी, कोण आहे तो?
| Updated on: Jul 15, 2023 | 7:30 PM

मुंबई | टीम इंडियाने वेस्ट इंडिजवर पहिल्या कसोटीतील तिसऱ्याच दिवशी एक डाव आणि 141 धावांनी विजय मिळवत 1-0 ने आघाडी घेतली. तर दुसऱ्या बाजूला बीसीसीआयने चीनमध्ये होणाऱ्या आगामी एशियन गेम्स स्पर्धेसाठी मेन्स आणि वूमन्स टीम इंडियाची घोषणा केली. या स्पर्धेत ऋतुराज गायकवाड हा टीम इंडियाचं कर्णधारपद सांभाळणार आहे. या दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने टीम इंडियाच्या 28 वर्षांच्या युवा खेळाडूला मोठी जबाबदारी दिली आहे.

बीसीसीआयने टीम इंडियातून गेले अनेक महिने बाहेर असलेल्या खेळाडूला कॅप्टन केलंय. हा खेळाडू टीम इंडियातून फेब्रुवारी 2022 पासून बाहेर आहे. आपण बोलतोय ते वेंकटेश अय्यर याच्याबाबत. वेंकटेश अय्यर याला देवधर ट्रॉफीसाठी सेंट्रल झोन टीमची कॅप्टन्सीची जबाबदारी देण्यात आली आहे.

वेंकटेश अय्यर याच्याकडे कर्णधारपदाची धुरा

वेंकटेश अय्यर याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

वेंकटेश अय्यर याने टीम इंडियाकडून 2 वनडे आणि 9 टी 20 मॅचेस खेळल्या आहेत. वेंकटेशने या वनडे क्रिकेटमध्ये 24 आणि टी 20 मध्ये 133 धावा केल्या आहेत. वेंकटेशला मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं नाही. वेंकटेशने टीम इंडियासाठी अखेरचा वनडे सामना 21 जानेवारी 2022 रोजी, तर टी 20 सामना 27 फेब्रुवारी 2022 रोजी खेळला होता. तेव्हापासून वेंकटेश टीम इंडियात कमबॅकच्या प्रयत्नात आहे. मात्र वेंकटेशची अजून ही प्रतिक्षा संपलेली नाही.

देवधर ट्रॉफी स्पर्धेबाबत थोडक्यात

देवधर ट्रॉफी स्पर्धेचा थरार हा 24 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान रंगणार आहे. महत्वाची बाब म्हणजे देवधर ट्रॉफी स्पर्धेचं 4 वर्षांनंतर यंदा पहिल्यांदा आयोजन करण्यात आलंय. याआधी 2019 साली देवधर ट्रॉफी स्पर्धा खेळवण्यात आली होती. त्यानंतर कोरोना आल्याने स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं नाही. या स्पर्धेतील सामने हे 50 ओव्हर्सचे असणार आहेत. स्पर्धेचं आयोजन हे 24 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान करण्यात आलंय.

देवधर ट्रॉफी स्पर्धेसाठी टीम सेंट्रल झोन

वेंकटेश अय्यर (कॅप्टन), माधव कौशिक, शिवम चौधरी, यश दुबे, यश कोठारी, रिंकू सिंह, आर्यन जुयाल, उपेंद्र यादव, कर्ण शर्मा, यश ठाकुर, आकाश मधवाल, मोहसिन खान, शिवम मावी, आदित्य सरवटे आणि अनिकेत चौधरी.