IND vs SA : दिनेश कार्तिक सामनावीर ठरला, विजयाचं श्रेय दिलं राहुल द्रविडला, काय कारण, जाणून घ्या…

दिनेश कार्तिकने 27 चेंडूत 55 आणि हार्दिक पंड्याने 31 चेंडूत 46 धावा केल्या.

IND vs SA : दिनेश कार्तिक सामनावीर ठरला, विजयाचं श्रेय दिलं राहुल द्रविडला, काय कारण, जाणून घ्या...
दिनेश आणि हार्दिक
Image Credit source: icc
| Updated on: Jun 18, 2022 | 7:15 AM

नवी दिल्ली : काल राजकोट (Rajkot) सौराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या भारतानं पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने (IND vs SA) जबरदस्त कमबॅक केलंय. या मोठ्या विजयामुळे दोन्ही संघानं आता 2-2 अशी बरोबरी केली आहे. भारताच्या 170 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव 17 षटकात 87 धावातच आटोपला. या मोठ्या फरकानं भारतानं विजय संपादन केलाय.  आता रविवारी होणारा पाचवा सामना निर्णायक ठरणार आहे. भारताच्या विजयाबद्दल बोलायचं झाल्यास विशाखापट्टनममधील तिसऱ्या आणि आज चौथ्या सामन्यात विजय मिळवून जोरदार कमबॅक केलंय. कालचा सामना भारतासाठी महत्वाचा होता. दक्षिण आफ्रिकेनं पहिले दोन टी 20 सामने जिंकल्यामुळे भारतीय संघ 2-0 असा पिछाडीवर होता. दोन्ही संघांच्या खेळाडूंबद्दल बोलायचं झाल्यास भारताच्या तुलनेत दक्षिण आफ्रिकेचा संघ (South Africa team) मजबूत आहे. तर दुसरीकडे भारतानं या संघात युवा खेळाडूंना संधी दिली आहे. दरम्यान, कालच्या सामन्यादेनंतर सलामीवीर दिनेश कार्तिकने विजयाचं संपूर्ण श्रेय राहुल द्रविडला दिलंय.

टीम इंडियाचं जबरदस्त कमबॅक

दिनेश कार्तिक सामन्यानंतर बोलताना म्हणाला की, ‘हे छान दिसत आहे. मला या सेटअपमध्ये खूप सुरक्षित वाटतंय. गेल्या सामन्यात माझ्या मनाप्रमाणे आणि मी ठरवल्याप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत. पण, या सामन्यात मी व्यक्त केले. पुढे बोलताना त्यानं प्रशिक्षकाला श्रेय दिलं आहे. तो म्हाणाला की, ‘ज्यांनी नेटमध्ये कठीण गोलंदाजीचा सामना करून मला अशा प्रकारे तयार केलं. ही खेळपट्टी फलंदाजीसाठी सोपी नव्हती. चौकार मारणं सोपं नव्हतं. आमच्या सलामीवीरांनी आतापर्यंत चांगली सुरुवात केली आहे. जेव्हा मी क्रीजवर पोहोचलो तेव्हा हार्दिक पंड्यानं मला सेट होण्यासाठी वेळ काढण्यास सांगितलं. अशा खेळपट्ट्यांवर खेळाडू राहणं आवश्यक आहे. बंगळुरू हे माझ्यासाठी घरच्या मैदानासारखे आहे. मी तिथं आरसीबीसाठी खेळलो नाही पण तिथे खूप खेळलो आहे.

पाचव्या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी

दिनेशने सामन्याची सूत्र हाती घेतली. त्याला उपकर्णधार हार्दिक पंड्याने देखील तितकीच तोलामोलाची साथ दिली. दोघांनी मिळून पाचव्या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी केली.

टीम इंडियात पुनरागमनाचे श्रेय राहुल द्रविडला देताना दिनेश कार्तिक पुढे म्हणतो की, ‘ही मालिका शेवटच्या सामन्यापर्यंत जात आहे हे चांगले आहे. तिसर्‍या आणि चौथ्या सामन्यात दडपणाखाली टीम इंडियाने ज्याप्रकारे कामगिरी केली त्यामुळे आनंद मिळतो. याचे श्रेय राहुल द्रविडला जाते. त्याच्या उपस्थितीत खूप शांतता आहे. ड्रेसिंग रूमचे वातावरण एकदम शांत आहे.’

कालचा सामना भारतासाठी विशेष

दिनेश कार्तिकने 27 चेंडूत 55 आणि हार्दिक पंड्याने 31 चेंडूत 46 धावा केल्या. या दोघांच्या बळावर भारताने निर्धारित 20 षटकात 6 बाद 169 धावा केल्या.