‘तो समोरच्या संघामध्ये भीतीचे वातावरण तयार करतो, भारतीय क्रिकेटचं भविष्य आहे’, दिनेश कार्तिककडून युवा खेळाडूबद्दल महत्त्वाची भविष्यवाणी

दिनेश कार्तिकच्या (Dinesh Karthik) मते हा युवा खेळाडू भारतीय संघातील एक महत्त्वाचा खेळाडू आहे. जो संघाला अनेक यशाची शिखरं गाठायला मदत करेल.

‘तो समोरच्या संघामध्ये भीतीचे वातावरण तयार करतो, भारतीय क्रिकेटचं भविष्य आहे’, दिनेश कार्तिककडून युवा खेळाडूबद्दल महत्त्वाची भविष्यवाणी
Follow us
| Updated on: Jun 08, 2021 | 12:01 PM

मुंबई : भारतीय क्रिकेट संघात (Indian Cricket Team) सध्या युवा खेळाडूंची फौज असून सर्व धुरा ही युवा खेळाडूंवरच आहे. यातील एक महत्त्वाचं नाव म्हणजे यष्टीरक्षक फलंदाज ‘ऋषभ पंत (Rishabh Pant).’ पंतबाबत संघाचा जेष्ठ खेळाडू दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) एक महत्त्वाची भविष्यवाणी केली असून ‘पंत हा भारतीय क्रिकेटचं भविष्य असून, तो भारतासाठी 100 हून अधिक कसोटी सामने खेळेल.’ असं कार्तिक म्हणाला आहे. भारताने गाबा येथे ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात भूमीत नमवत ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयात सिंहाचा वाटा असणाऱ्या पंतने मागील काही महिन्यांत आपला खेळ कमालीचा सुधारला आहे. भारतीय संघातील अव्वल यष्टीरक्षक फलंदाज झाल्याने पंतने आपली जागा पक्की केली आहे. सध्या भारत इंग्लंड दौऱ्यावर असून तिथेही पंतच्या खेळीवर सर्वांचीच नजर असणार आहे. (Dinesh Karthik Praises Rishabh Pant Says he Will Play 100 Tests For India)

सर्वांसह भारताचा जेष्ठ खेळाडू दिनेशला देखील पंतचा खेळ कमालीचा आवडला असून भारतीय संघासाठी पंत 100 हून अधिक कसोटी सामने खेळेल असे म्हणत दिनेशने पंतची पाठ थोपटली आहे. कार्तिक स्पोर्ट्स टुडेशी बोलताना म्हणाला, ”मला वाटतं काही काळातच पंतने अप्रतिम कामगिरी केली आहे. अत्यंत तणाव असणारे काही सामने त्याने खेचून आणले आहेत. त्यात वर्ल्डकप सेमीफायनल, आयपीएल तसंच ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील काही सामन्यांचा समावेश होतो. अशा अवघड मॅचेस जिंकवून देण्याची, तणाव झेलण्याची क्षमता पंतमध्ये आहे.”

‘पंत भारतीय क्रिकेट संघाचं भविष्य’

दिनेश कार्तिक म्हणाला, ”ऋषभ पंत भारतीय क्रिकेटचं भविष्य आहे. तो टी-20, एकदिवसीयसह कसोटी सामन्यातही कमाल करेल आणि भारतासाठी 100 हून अधिक कसोटी सामने खेळेल. संघासाठी तो एक महत्त्वाचा खेळाडू असून संघाचा खेळ उंचवण्यासाठी तो महत्त्वाची मदत करेल”

हे ही वाचा :

‘हा’ खेळाडू टीम इंडियामधून बाहेर जाण्याच्या मार्गावर, मागील 20 सामन्यांत केवळ 23 विकेट्स

न्यूझीलंडचा कर्णधार म्हणतो, ‘भारताची बोलिंग जगात एक नंबर, विराट माझा मित्र पण…’

भारताचा श्रीलंका दौरा, विराट कोहलीच्या अनुपस्थितीत या खेळाडूकडे कर्णधारपदाची धुरा?

(Dinesh Karthik Praises Rishabh Pant Says he Will Play 100 Tests For India)

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.