AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हा’ खेळाडू टीम इंडियामधून बाहेर जाण्याच्या मार्गावर, मागील 20 सामन्यांत केवळ 23 विकेट्स

भारताचा हा फिरकीपटू मागील बरीच वर्ष झालं प्रत्येक दौऱ्यात आणि महत्त्वाच्या सामन्यात टीम इंडियामध्ये असतो. मात्र मागील काही सामन्यांपासून त्याची कामगिरी निराशाजनक दिसून येत आहे.

'हा' खेळाडू टीम इंडियामधून बाहेर जाण्याच्या मार्गावर, मागील 20 सामन्यांत केवळ 23 विकेट्स
team india
| Edited By: | Updated on: Jun 08, 2021 | 11:13 AM
Share

मुंबई : भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) सध्या क्रिकेटच्या तिन्ही फॉरमेटमध्य़े उत्तम कामगिरी करतोय. त्यामुळे संघातील खेळाडूही तितकीच अव्वल कामगिरी करणारे असायला हवेत. त्यामुळे एखादा खेळाडू सातत्याने निराशाजनक कामगिरी करत असल्यास त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येतो. अशीच काहीशी परिस्थिती ओढावली आहे, फिरकीपटू युजवेंद्र चहलवर (Yuzvendra Chahal). चहल मागील बरीच वर्ष संघात आहे. मात्र मागील 20 सामन्यांत चहलने केवळ 23 विकेट्स घेतल्या असून त्याच्या ओव्हरमध्ये रन देखील खूप आले आहेत. त्यामुळे त्याच्या कामगिरीवर प्रश्न उठवले जात आहेत. (Yuzvendra Chahal is Out Of Form Which May Lead Him To Go Out Of India Team For Sri Lanka Tour)

सध्या भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. ज्यात चहलला संधी देण्यात आलेली नाही. मात्र काही महिन्यांतच भारत श्रीलंका दौऱ्यावर (Sri Lanka Tour)जाणार असून यावेळी चहल संघात असणार आहे. या दौऱ्यासाठी चहल उत्सुक असला तरी त्याच्या खराब फॉर्ममुळे त्याच्यावर प्रश्न उठवले जात आहेत. चहलने मागील 10 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांत 9 विकेटच घेतले आहेत. तसेच मागील 5 सामन्यांत त्याच्या 4 ओव्हरमध्ये 40 हून अधिक रन्स त्याला पडले आहेत. एकदिवसीय सामन्यातही शेवटच्या 10 सामन्यांत त्याने केवळ 14 विकेटच घेतल्या आहेत. दरम्यान कामगिरीवर विचारलेल्या प्रश्नाबाबत टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना चहल म्हणाला, ‘मला नाही वाटत मी आउट ऑफ फॉर्म आहे. मी बऱ्याच वेळापासून खेळत आहे. मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह आयपीएलमध्येही खेळतो. अशावेळी प्रत्येक वेळी तुम्ही विकेट्स घेऊच शकता असं नाही. असाही वेळ येतो की, एखाद्या गोलंदाजाला दोन सामन्यांतही एक विकेट मिळत नाही. याचा अर्थ तो फॉर्ममध्ये नाही असा नसतो. टी-20 मध्ये पूर्ण कंट्रोलने बोलिंग करावी लागते. विकेट्स घेण्याबरोबर कमी रन्स देण्यावरही लक्ष ठेवावं लागतं.”

‘माझ्याकडून अपेक्षा वाढल्यात’

चहल असंही म्हणाला की, ”लोकांना मला विकेट्स घेताना पाहण्याची सवय झाली आहे. या लेव्हलला पोहचण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळे मी जेव्हा विकेट घेत नाही तेव्हा माझे चाहते निराश होतात. ज्यामुळे माझ्या फॉर्मवर प्रश्न उठवले जातात. मात्र सध्यातरी माझ्या फॉर्ममध्ये खराबी आलेली नसून ही 1-2 मॅचची गोष्ट आहे. अशीच परिस्थिती फलंदाजावरही येते. तुम्ही लवकरच मला विकेट्स घेताना पाहाल.” चहलने आतपर्यंत भारतासाठी 54 एकदिवसीय सामन्यांत 92 विकेट्स घेतल्या आहेत. तर 48 टी-20 सामन्यांत 62 विकेट्स घेतल्या आहेत.

‘कोहली म्हणतो- युजी प्रेशर नको घेऊ’

चहल भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) खास खेळाडूंपैकी एक असल्याचं सगळ्यांनाच माहित आहे. चहल विराट कर्णधार असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमधूनच (RCB) खेळतो. त्यामुळे संघात खेळण्याच्या प्रश्नावर चहल म्हणाला, ‘विराटकडून मला खूप सपोर्ट मिळतो. आयपीएलमध्ये मला विराट म्हणाल ही होता, की युजी जसा तू बॉल टाकतोस तसाच टाक काही बदल नको करुस. हा केवळ एक खराब टाईम आहे, प्रेशर नको घेऊ.’

हे ही वाचा :

न्यूझीलंडचा कर्णधार म्हणतो, ‘भारताची बोलिंग जगात एक नंबर, विराट माझा मित्र पण…’

भारताचा श्रीलंका दौरा, विराट कोहलीच्या अनुपस्थितीत या खेळाडूकडे कर्णधारपदाची धुरा?

(Yuzvendra Chahal is Out Of Form Which May Lead Him To Go Out Of India Team For Sri Lanka Tour)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.