AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचा श्रीलंका दौरा, विराट कोहलीच्या अनुपस्थितीत या खेळाडूकडे कर्णधारपदाची धुरा?

टीम इंडिया या दौऱ्यासाठी 5 जुलैला श्रीलंकेत पोहचण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर पुढील आठवडा भारतीय संघ क्वारंटाईन राहिल. यानंतर 13 जुलैपासून 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होईल. | India tour of Srilanka

भारताचा श्रीलंका दौरा, विराट कोहलीच्या अनुपस्थितीत या खेळाडूकडे कर्णधारपदाची धुरा?
विराट कोहली
| Edited By: | Updated on: Jun 08, 2021 | 6:40 AM
Share

मुंबई :  टीम इंडियाचे नवोदित खेळाडू जुलै महिन्यात विराट कोहली (Virat kohli) आणि अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया वनडे आणि टी 20 मालिका खेळणार आहे. या दौऱ्यावर भारताच्या युवा खेळाडूंना संधी मिळणार आहे. त्यामुळे सर्व युवा खेळाडूंमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तसेच खेळाडू या दौऱ्यासाठी उत्सुक आहेत. टीम इंडिया श्रीलंकेत (Team India Srilanka Tour) 13 ते 25 जुलै दरम्यान तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका आणि तीन टी -20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या सामन्याचं प्रक्षेपण करणारी वाहिनी सोनीने (Sony TV) सोमवारी ही घोषणा केली. मर्यादित षटकांच्या मालिकेच्या या दौर्‍यासाठी भारतीय सिलेक्टर्सनी संघातील अनेक नवोदित खेळाडूंना स्थान देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. टीम इंडियाचा धडाकेबाज ओपनर शिखर धवनला संघाचा कर्णधार म्हणून संधी देण्यात येईल, अशी जवळपास शक्यता आहे. (Team India Tour of Sri Lanka From 13 July Shikhar Dhawan may be Indian Team Captain)

india tour of Srilanka

India Tour of Srilanka

सोनी टीव्हीची घोषणा

टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्याच्या कार्यक्रमाची घोषणा अधिकृतरित्या अद्याप बीसीसीआयने केलेली नसली तरी सामन्यांची प्रेक्षपण करणारी वाहिनी म्हणून सोनीने श्रीलंका दौऱ्याचा कार्यक्रम सांगितला आहे. सोनीने एक ट्विट केलंय. ट्विटमध्ये म्हटलंय, “भारतीय संघ श्रीलंकेला भिडणार आहे, 13,16 आणि 18 जुलैला एकदिवसीय सामने खेळले जातील तर 21, 23 आणि 25 जुलैला टी ट्वेन्टी सामने खेळले जातील.” सोनीने जरी तारखा सांगितलेल्या असल्या तरी सामन्यांची ठिकाणं मात्र सांगितलेली नाहीत.

भारत लवकरच श्रीलंका दौऱ्यावर, एकदिवसीय आणि टी ट्वेन्टीचा थरार

टीम इंडिया या दौऱ्यासाठी 5 जुलैला श्रीलंकेत पोहचण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर पुढील आठवडा भारतीय संघ क्वारंटाईन राहिल. यानंतर 13 जुलैपासून 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होईल. तर त्यानंतर 22 जुलैपासून टी 20 सीरिजचा शुभांरभ होईल.

टीम इंडियाचा संभाव्य संघ

पृथ्वी शॉ, शिखर धवन, देवदत पडिक्कल, सूर्यकुमार यादव, इशान किशन, संजू सॅमसन, मनिष पांडे, ऋतुराज गायकवाड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, राहुल तेवतिया, शिवम दुबे, विजय शंकर, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, नवदीप सैनी, हर्षल पटेल, खलील अहमद, जयदेव उनादकट, चेतन सकारिया, वरुण चक्रवर्ती, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, राहुल चहर.

हे ही वाचा :

IPL 2021 Schedule : आयपीएलच्या नव्या तारखा ठरल्या, दसऱ्याला फायनल!

ऋषभ पंत की टीम पेन, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक बळी कोणाच्या नावावर

Pakistan Super League : वेगवान चेंडू तोंडावर आदळा, विकेटकीपर जखमी, तोंडाला सात टाके

मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.