Dinesh Kartik : 6, 6, 6 अन् चौकार, दिनेश कार्तिकची फटकेबाजी, पाहा Highlights Video

| Updated on: May 08, 2022 | 9:21 PM

शेवटच्या षटकात त्याच्या बॅटने हॅट्ट्रिक षटकारासह एकूण चार चौकार लगावले. त्यामुळे संघाला 192 धावांपर्यंत मजल मारता आली.

Dinesh Kartik : 6, 6, 6 अन् चौकार, दिनेश कार्तिकची फटकेबाजी, पाहा Highlights Video
दिनेश कार्तिकची फटकेबाजी
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमधील 54 वा सामना सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि संघाने 20 षटकांत 3 गडी गमावून 192 धावा केल्या. हैदराबादसमोर 193 धावांचं ठेवलं होतं. प्रत्युत्तरात हैदराबाद संघाला 19.2 षटकांत सर्व विकेट्स गमावून केवळ 125 धावाच केल्या. यामुळे 67 धावांनी हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागलाय. 193 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादला पहिला धक्का कर्णधार केन विल्यमसनच्या रूपाने बसला तो चेंडू न खेळताच धावबाद झाला. ग्लेन मॅक्सवेलने पहिल्याच षटकात अभिषेक शर्माला क्लीन बोल्ड केलं. राहुल त्रिपाठीने सर्वाधिक 58 धावा केल्या. त्याने 37 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकार ठोकले. पूरनने 19 आणि मार्करामने 21 धावा केल्या. विशेष म्हणजे आज सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात दिनेशनं पराक्रम केलाय. शेवटच्या षटकात त्याच्या बॅटने हॅट्ट्रिक षटकारासह एकूण चार चौकार लगावले.

6, 6, 6 अन् चौकार, VIDEO पाहण्याासाठी इथे क्लिक करा

हे सुद्धा वाचा

दिनेश कार्तिकची फटकेबाजी

अखेरच्या षटकात षटकार मारून हॅट्ट्रिक

यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने अखेरच्या षटकात षटकार मारून हॅट्ट्रिक साधली. त्याने तिसऱ्या चेंडूवर अफगाणिस्तानच्या फजलहक फारुकीविरुद्ध मिड-विकेटवर षटकार ठोकला. तिथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या राहुल त्रिपाठीच्या हातात कार्तिकचा शॉट गेला. पण चेंडू त्याच्या हातातून गेला आणि बंगळुरूला 6 धावा मिळाल्या. पुढच्या चेंडूवर लाँग ऑनला षटकार मारला. फारुकीने संथ तिसरा चेंडू टाकला पण कार्तिकने तो डीप मिड-विकेटच्या सीमारेषेच्या बाहेर पाठवला. तो इथेच थांबला नाही आणि ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर चौकारही मारला.

ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर चौकारही

8 चेंडूंच्या खेळीत चार षटकार आणि एका चौकार

दिनेश कार्तिक खेळपट्टीवर फलंदाजीसाठी आला तेव्हा बेंगळुरूची धावसंख्या 18.2 षटकात 159 धावा होती. डावात फक्त 8 चेंडू शिल्लक होते. कार्तिकने लागोपाठ दोन डॉट बॉल खेळले. मात्र त्यानंतरही संघाने 192 धावांपर्यंत मजल मारली. १९व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर त्याने कार्तिक त्यागीविरुद्ध षटकारही ठोकला. दिनेश कार्तिकने 8 चेंडूंच्या खेळीत चार षटकार आणि एका चौकारासह 30 धावा केल्या.

लागोपाठ दोन डॉट बॉल खेळले

कर्णधार फाफ डू प्लेसिसने बंगळुरूकडून 73 धावांची नाबाद खेळी खेळली. यामुळेच पहिल्या चेंडूवर विकेट पडल्यानंतरही संघाने 3 बाद 192 धावा केल्या होत्या. रजत पाटीदार आणि डु प्लेसिसमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 105 धावांची भागीदारी झाली. पाटीदारचे अर्धशतक हुकले आणि तो 48 धावांवर बाद झाला.