AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022, SRH vs RCB : 67 धावांनी बंगलौरचा विजय, हसरंगाने घेतल्या तब्बल 5 विकेट, पाहा Highlights Video

राट कोहली पहिल्याच चेंडूवर बाद झाला. या मोसमात विराट तिसऱ्यांदा खातेही न उघडता बाद झाला आहे.

IPL 2022, SRH vs RCB : 67 धावांनी बंगलौरचा विजय, हसरंगाने घेतल्या तब्बल 5 विकेट, पाहा Highlights Video
हसरंगाने 5 विकेट घेतल्याImage Credit source: twitter
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: May 08, 2022 | 8:27 PM
Share

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमधील 54 वा सामना सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि संघाने 20 षटकांत 3 गडी गमावून 192 धावा केल्या. हैदराबादसमोर 193 धावांचं ठेवलं होतं. प्रत्युत्तरात हैदराबाद संघाला 19.2 षटकांत सर्व विकेट्स गमावून केवळ 125 धावाच केल्या. यामुळे 67 धावांनी हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागलाय. 193 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादला पहिला धक्का कर्णधार केन विल्यमसनच्या रूपाने बसला तो चेंडू न खेळताच धावबाद झाला. ग्लेन मॅक्सवेलने पहिल्याच षटकात अभिषेक शर्माला क्लीन बोल्ड केलं. राहुल त्रिपाठीने सर्वाधिक 58 धावा केल्या. त्याने 37 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकार ठोकले. पूरनने 19 आणि मार्करामने 21 धावा केल्या.

हैदराबाद विरुद्ध बंगलौरचे हायलाईट्स व्हिडीओ, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

67 धावांनी बंगलौर जिंकला

सुपर षटकार, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

बंगळुरूची सुरुवातही खराब

बंगळुरूची सुरुवातही खराब झाली. विराट कोहली पहिल्याच चेंडूवर बाद झाला. या मोसमात विराट तिसऱ्यांदा खातेही न उघडता बाद झाला आहे. फाफ डू प्लेसिसने अर्धशतक ठोकले. रजत पाटीदार 48 धावा करून बाद झाला. मॅक्सवेल 33 धावा करून बाद झाला. त्याचवेळी फाफ डू प्लेसिस 73 आणि दिनेश कार्तिक 8 चेंडूत 30 धावा करून नाबाद माघारी परतले.

हसरंगाने 5 विकेट घेतल्या

बंगळुरूचा फिरकीपटू हसरंगानं या सामन्यात 5 विकेट घेतल्या आहेत. त्याने चौथ्या षटकात शंशाकला पहिला झेलबाद करून चौथी विकेट घेतली. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर उमरानला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

हसरंगाच्या पाच विकेट, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

डू प्लेसिसमुळे धावांचा डोंगर

आज सलामीवीर विराट कोहली डावखुरा फिरकी गोलंदाज जगदीश सुचिताच्या बॉलिंगवर शुन्यावर आऊट झाला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. केन विलियमसनकडे सोपा झेल त्याने दिला. डू प्लेसिसने आज डावाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्यामुळेच RCB च्या अन्य फलंदाजांना मोकळेपणाने फटकेबाजी करता आली. फाफ डू प्लेसिसने अर्धशतक ठोकले.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार