AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काबूलमध्ये शाळेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर Rashid Khan चं भावनिक आवाहन

शिक्षणाच्या काळजीपोटी राशिद खानने केलेलं अपील खूप महत्त्वाचं आहे.

काबूलमध्ये शाळेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर Rashid Khan चं भावनिक आवाहन
Rashid KhanImage Credit source: instagram
| Updated on: Oct 04, 2022 | 2:47 PM
Share

मुंबई: काबूलमध्ये आत्मघातकी दहशतवादी हल्ला झाला. त्यावर क्रिकेटपटू राशिद खान आणि रहमत शाह यांनी आपलं रोखठोक मत मांडलं आहे. या हल्ल्यात 10 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला. काबूलमध्ये शुक्रवारी शाळेवर आत्मघातकी दहशतवादी हल्ला झाला. युनायटेड नेशनुसार, यात 46 मुली आणि महिलांचा मृत्यू झाला.  काबूलच्या जवळच हजारा आहे, तिथे एका शाळेत हा आत्मघातकी बॉम्बस्फोट झाला. यूएन मिशनने दिलेल्या माहितीनुसार, 53 जणांचा मृत्यू झाला. 110 जण या हल्ल्यात जखमी झाले आहेत.

राशिद खानने काय संदेश दिला ?

काबूलमध्ये ICU बाहेर एक किशोरवयीन मुलगी बहिणीची बॅग घेऊन बसल्याचा फोटो ऑनलाइनवर आला होता. या फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. राशिद खानने एका शालेय मुलीचा फोटो शेयर करुन जनतेसोबत असल्याचा संदेश दिला आहे. त्याने शिक्षणाचा हत्या करु नका असा संदेश दिला आहे. रेहमत खाननेही तोच फोटो पोस्ट करुन हार्ट ब्रेकचा इमोजी पोस्ट केला आहे.

आयपीएलमधून नावारुपाला आला

अफगाणिस्तानातील क्रिकेटपटुंनी शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. राशिद खान हा लोकप्रिय क्रिकेटपटू आहे. फक्त अफगाणिस्तानातच नाही, तर भारतातही त्याच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. लेग ब्रेक गोलंदाजी करणारा राशिद खान आयपीएलमधून नावारुपाला आला.

अफगाणिस्तानच्या टीमकडून अपेक्षा

मागच्या महिन्यात झालेल्या आशिया कप स्पर्धेत अफगाणिस्तानच्या टीमने चांगली कामगिरी केली होती. या महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतही अफगाणिस्तानच्या टीमकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे.

अफगाणिस्तानची टीम कुठल्या ग्रुपमध्ये?

टी 20 वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानची टीम ग्रुप 1 मध्ये आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इंग्लंडची टीम या ग्रुपमध्ये आहे. 22 ऑक्टोबरला अफगाणिस्तानच्या वर्ल्ड कप अभियानाला सुरुवात होणार आहे. इंग्लंड विरुद्ध त्यांचा पहिला सामना होणार आहे.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.