AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL T20 : भारत श्रीलंका टी20 मालिकेपूर्वीच धक्का, या खेळाडूची रिप्लेसमेंट शोधण्याची आली वेळ

भारत श्रीलंका टी20 मालिका 27 जुलैपासून सुरु होणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघ कसून सराव करत आहे. कारण या मालिकेपासून संघाची 2026 वर्ल्डकपच्या दृष्टीने पायाभरणी होणार आहे. पण या मालिकेपूर्वीच एक खेळाडू जखमी झाल्याने चिंता वाढली आहे. आता त्याच्याऐवजी दुसऱ्या खेळाडूची शोधाशोध सुरु झाली आहे.

IND vs SL T20 : भारत श्रीलंका टी20 मालिकेपूर्वीच धक्का, या खेळाडूची रिप्लेसमेंट शोधण्याची आली वेळ
Image Credit source: AFP
| Updated on: Jul 24, 2024 | 3:43 PM
Share

भारत आणि श्रीलंका यांच्यात 27 जुलैपासून तीन सामन्यांची टी20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेसाठी फक्त दोन दिवसांचा अवधी शिल्लक आहे.  असं असताना श्रीलंकन क्रिकेट संघाला धक्का बसला आहे. श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने मंगळवारी टी20 मालिकेसाठी संघाची घोषणा केली होती. पण 24 तासाच्या आतच श्रीलंकन क्रिकेट संघाच्या चिंतेत भर पडली आहे. कारण वेगवान गोलंदाज दुष्मंता चमीरा दुखापतग्रस्त झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तो या मालिकेला मुकणार आहे. वानिंदु हसरंगा याने टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर कर्णधारपद सोडलं होतं. त्यानंतर चरिथ असलंका याच्या हाती कमान सोपवली होती. तसेच 16 खेळाडूंच्या चमूत दुष्मंता चमिरा याची निवड केली होती. पण आता दुखापतग्रस्त असल्याने मालिकेत खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याच्या दुखापतीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. दुष्मंता चमिरा हा लंका प्रीमियर लीगमध्ये खेळला होता. त्यात त्याला दुखापत झाली होती.

दुष्मंता चमिरा खेळणार नसल्याने श्रीलंकेच्या गोटात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. कारण भारताविरुद्ध टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याने भारताविरुद्ध खेळलेल्या 15 टी20 सामन्यात 16 गडी बाद केले आहेत. त्यामुळे त्याची उणीव श्रीलंकेला या मालिकेत भासेल, यात शंका नाही. श्रीलंका क्रिकेट निवड समिती अध्यक्ष उपुल थरंगा यांनी सांगितलं की, ‘दुखापतीबाबत खुलासा केलेला नाही. पण 32 वर्षीय वेगवान गोलंदाज मालिकेत खेळणार नाही हे स्पष्ट आहे.’

दुष्मंता चमिराऐवजी संघात असिथा फर्नांडो याला स्थान मिळू शकतं. दुसरीकडे दुष्मंता वनडे मालिकेपूर्वी बरा होतो की नाही याची चिंता लागून आहे. कारण टी20 मालिकेनंतर भारतीय संघासोबत तीन सामन्यांची वनडे सीरिज आहे. श्रीलंकेने वनडे मालिकेसाठी अजूनही संघ जाहीर केलेला नाही. त्यात टीम इंडियाकडून वनडे मालिकेत दिग्गज खेळाडू असणार आहेत. त्यामुळे श्रीलंकेला अनुभवी गोलंदाजाची उणीव भासू शकते.

दोन्ही संघांचे खेळाडू

श्रीलंकेचा टी20 संघ : चरित असलंका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल परेरा, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चंडीमल, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा,महिष थिक्षाणा,चमिंडू विक्रमसिंघे, मथीशा पथिराना, नुवान तुषारा, दुनिथ वेल्लालगे,  बिनुरा फर्नांडो.

भारताचा टी20 संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशवी जयस्वाल, रिंकू सिंह, रियान पराग, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.