MI vs CSK IPL 2022: आधी Bravo ने पोलार्डच्या दिशेने जोरात बॉल फेकला, नंतर दिली KISS पहा VIDEO

MI vs CSK IPL 2022: इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्सचे संघ (MI vs CSK) आमने-सामने येतात, तेव्हा वातावरण तापवणारे, मैदानात संघर्षाचे काही किस्से घडतात.

MI vs CSK IPL 2022: आधी Bravo ने पोलार्डच्या दिशेने जोरात बॉल फेकला, नंतर दिली KISS पहा VIDEO
bravo-pollard Image Credit source: Screengrab
Follow us
| Updated on: Apr 21, 2022 | 10:20 PM

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्सचे संघ (MI vs CSK) आमने-सामने येतात, तेव्हा वातावरण तापवणारे, मैदानात संघर्षाचे काही किस्से घडतात. आजचा डी.वाय.पाटील स्टेडियमवर सुरु असलेला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्समधला सामनाही याला अपवाद नाहीय. आजच्या सामन्यातही कायरन पोलार्ड (Kieron Pollard) आणि ड्वेयन ब्राव्होमध्ये (Dwayne Bravo) असाच एक संघर्षाचा प्रसंग पहायला मिळाला. दोघेही वेस्ट इंडिजचे खेळाडू आहेत. पोलार्ड मुंबई इंडियन्स तर ब्राव्हो चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतो. चेन्नईने नाणेफेक जिंकून आज प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कॅप्टन रवींद्र जाडेजाचा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. मुकेश चौधरीने आज जबरदस्त स्पेल टाकला. त्याने पहिल्या तीन षटकात 19 धावा देत तीन विकेट घेतल्या व मुंबई इंडियन्सला बॅकफूटवर ढकललं. रोहित शर्मा, इशान किशन आणि डेवाल्ड ब्रेविस हे स्वस्तात बाद झाले.

ब्राव्होची Action त्यावर पोलार्डची अजब Reaction

कायरन पोलार्ड आज फलंदाजीला आला तेव्हा मुंबईचा डाव अडचणीत होता. पोलार्ड मैदानात आल्यानंतर त्याच्या चौकार-षटकारांबरोबर काही विशेष Actions ची नेहमीच चर्चा होते. आजही तसंच झालं. पोलार्ड फलंदाजी करत असताना समोर ब्राव्हो गोलंदाजी करत होता. ब्राव्होच्या चेंडूला आदर देत पोलार्डने डिफेन्स केला. चेंडू ब्राव्होच्या हातात गेल्यानंतर त्याने तो समोर असलेल्या पोलार्डच्या दिशेने फेकला. पोलार्डला तो बॉल लागला नाही. पण त्यानंतर पोलार्डने ब्राव्होच्या डोक्यावर किस देऊन त्याला परत पाठवलं. ब्राव्होची Action त्यावर पोलार्डच्या अजब Reaction चा व्हिडिओ आता व्हायरल झालाय.

तिलक वर्माची उत्तम फलंदाजी

मुंबईने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 ओव्हर्समध्ये सात बाद 155 धावा केल्या. पोलार्डने या सामन्यात 9 चेंडूत 14 धावा केल्या. यात एक चौकार आणि एक षटकार आहे. माहीश तीक्ष्णाच्या गोलंदाजीवर शिवम दुबेकडे त्याने झेल दिला. मुंबईकडून तिलक वर्माने सर्वाधिक नाबाद 51 धावांची खेळी केली. त्यामुळे मुंबई इंडियन्सला 150 धावांचा टप्पा ओलांडता आला. मुंबई इंडियन्सला प्लेऑफचं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी आजच्या सामन्यात विजय आवश्यक आहे.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.