दुखापत नाही… आऊटही नाही… तरीही इशान किशनने 250 धावा करून मैदान सोडलं, असं होतं कारण

दुलीप ट्रॉफी 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इशान किशनने द्विशतकी खेळी केली. साउथ झोन विरुद्ध खेळताना त्याने अनेक विक्रम मोडले. खरं तर त्याच्याकडे लयीत असताना त्रिशतकी खेळी करण्याची संधी होती. पण त्याने अचानक मैदान सोडलं.

दुखापत नाही... आऊटही नाही... तरीही इशान किशनने 250 धावा करून मैदान सोडलं, असं होतं कारण
दुखापत नाही... आऊटही नाही... तरीही इशान किशनने 250 धावा करून मैदान सोडलं, असं होतं कारण
Image Credit source: Twitter
| Updated on: Sep 07, 2026 | 6:07 PM

दुलीप ट्रॉफी 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत ईस्ट झोन आणि साउथ झोन संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात ईस्ट झोनने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. या निर्णय योग्यच ठरला असा म्हणावं लागेल. सलग दोन दिवस ईस्ट झोनने फलंदाजी केली आणि 708 धावांपर्यंत मजल मारली. या सामन्यात कर्णधार इशान किशनने साउथ झोनच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. 334 चेंडूंचा सामना केला आणि 270 धावा करून बाद झाला. पण लयीत असताना मैदान सोडलं आणि गडबड झाली. इशान किशनने 301 चेंडूत 250 धावांची खेळी केली. त्यानंतर लगेचच त्याने मैदान सोडलं. दुखापत किंवा आऊट झाला म्हणून मैदान सोडलं नाही तर अचानक रिटायर्ड हर्ट होण्याचा निर्णय घेतला. पण इशान किशनने असा निर्णय घेण्याचं कारण काय? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला.

ईस्ट झोनच्या 130.1 षटकांत 5 बाद 611 धावा असताना इशान किशन रिटायर्ड झाला. कारण 250 धावांची खेळी करताना पुरता घामाघूम झाला होता. अंतिम फेरीचा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये होत आहे. या ठिकाणी प्रचंड उकाडा आहे. 250 धावांची खेळी पर्यंत इशान किशनने खूप गाळला होता. पण त्यानंतर त्याला गरगरत होतं. त्याने तात्काळ फिजिओला बोलवलं आणि रिटायर्ड हर्ट होण्याचा निर्णय घेतला. इशान किशनने 71 चेंडूत अर्धशतक, त्यानंतर 118 चेंडूत शतक, 204 चेंडूत दीड शतक, 270 चेंडूत अर्धशतक आणि 300 चेंडूत 250 धावा केल्या.

ईस्ट झोनने 680 धावांवर सातवी विकेट गमावली आणि इशान किशन पुन्हा फलंदाजी आली आहे. पण त्याची खेळी फार काळ टिकू शकली नाही. वैयक्तिक 270 धावा केल्या आणि बाद झाला. या खेळीसह इशान किशनने काही विक्रम आपल्या नावावर केले. इशान किशन दुलीप ट्रॉफी स्पर्धेत द्विशतक ठोकणारा ईस्ट झोनचा पहिला कर्णधार आहे. या स्पर्धेच्या इतिहासात अंतिम फेरीत द्विशतकी खेळी करणारा पहिला विकेटकीपर फलंदाज ठरला आहे. 31 वर्षानंतर ईस्ट झोनच्या खेळाडूने दुलीप ट्रॉफीत द्विशतक ठोकलं आहे. इशानने या स्पर्धेत पहिल्यांदा शतक ठोकलं आणि त्याचं रुपांतर द्विशतकामध्ये केलं. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये इशानचं दहावं शतक असून दहा वर्षानंतर द्विशतक ठोकलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us