T20 World Cup 2026: इंग्लंडकडून वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम जाहीर, कुणाला संधी?

England T20i World Cup Squad 2026 : इंग्लंड क्रिकेट टीम हॅरी ब्रूक याच्या नेतृत्वात आयसीसी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धा खेळण्यासाठी भारतात येणार आहे. इंग्लंडचे या मोहिमेतील पहिले दोन्ही सामने मुंबईत होणार आहेत. जाणून घ्या कुणाला संधी मिळाली.

T20 World Cup 2026: इंग्लंडकडून वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम जाहीर, कुणाला संधी?
England Cricket Team
Image Credit source: @englandcricket x account
| Updated on: Dec 30, 2025 | 4:55 PM

भारतात आणि श्रीलंकेत आगामी आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने शनिवारी 20 डिसेंबर रोजी भारतीय संघाची घोषणा केली. सूर्यकुमार यादव हा भारताचं नेतृत्व करणार आहे. टीम इंडियानंतर तब्बल 10 दिवसांनी इसीबी अर्थात इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मंगळवारी 30 डिसेंबरला वर्ल्ड कप स्पर्धेसाठी (Icc T20i World Cup 2026) टीमची घोषणा केली आहे. हॅरी ब्रूक (Harry Brook) इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

जोश टंग याचा समावेश

इसीबीने वर्ल्ड कपसाठीच्या 15 सदस्यीय संघात जोश टंग याचा समावेश केला आहे. टंग याने आतापर्यंत व्हाईट बॉल (वनडे आणि टी 20i) क्रिकेटमध्ये पदार्पण केलेलं नाही. मात्र त्यानंतरही हेड कोच ब्रँडन मॅक्युलम आणि कॅप्टन हॅरी ब्रूक या दोघांनी टंगवर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे आता टंगला संधी मिळाल्यास बॉलिंगने कशी कामगिरी करतो? याकडे टीम मॅनेजमेंटचं लक्ष असणार आहे.

जोफ्रा आर्चर याचा समावेश

निवड समितीने वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याचा समावेश केला आहे. जोफ्राला एशेज सीरिजमधील तिसऱ्या सामन्यात दुखापत झाली. त्यामुळे जोफ्राला मालिकेतील उर्वरित 2 सामन्यांमधून बाहेर व्हावं लागलं होतं. मात्र त्यानंतरही जोफ्राचा निवड समितीकडून वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या प्राथमिक संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता जोफ्रा वर्ल्ड कपपर्यंत फिट होतो की नाही? याकडे टीम मॅनेजमेंटचं बारीक लक्ष असणार आहे.

इंग्लंड वर्ल्ड कप स्पर्धेत कुणाविरुद्ध खेळणार?

दरम्यान वर्ल्ड कप स्पर्धेला 7 फेब्रुवारीला सुरुवात होणार आहे. तर इंग्लंड स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी अर्थात 8 फेब्रुवारीला वर्ल्ड कप मोहिमेतील आपला पहिला सामना खेळणार आहे. इंग्लंडसमोर या सामन्यात नेपाळचं आव्हान असणार आहे. इंग्लंड दुसर्‍या सामन्यात 11 फेब्रुवारीला वेस्ट इंडिज विरुद्ध भिडणार आहे. इंग्लंडने पहिले दोन्ही सामने मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहेत.

वर्ल्ड कपसाठी इंग्लंड टीम जाहीर

इंग्लंडसमोर तिसऱ्या सामन्यात 14 फेब्रुवारीला बांगलादेशचं आव्हान असणार आहे. तर इंग्लंड या साखळी फेरीतील चौथा आणि शेवटचा सामना इटली विरुद्ध खेळणार आहे.

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी इंग्लंड क्रिकेट टीम : हॅरी ब्रूक (कॅप्टन) बेन डकेट, विल जॅक्स, फिल सॉल्ट, जोस बटलर, जेकब बेथेल, टॉम बँटन, रियान अहमद, जोफा आर्चर, जोश टंग, ल्यूक वुड, आदिल रशीद, सॅम करन, जेमी ओव्हरटन आणि लायम डॉसन.