Irfan Pathan : ‘एकतर पूर्ण सीजन खेळ किंवा येऊ नको’, इरफान पठाण कुठल्या खेळाडूवर इतका भडकला?
Irfan Pathan : कॉमेंट्री करताना इरफान पठाण आपली मत स्पष्टपणे मांडत असतो. यंदाच्या आयपीएल 2024 च्या सीजनमध्ये इरफान पठाणने अनेक खेळाडूंबद्दल आपली रोखठोक मत व्यक्त केली आहे. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्याला त्याने अनेकदा लक्ष्य केलं. तोच इरफान पठाण एका खेळाडूवर संतापला आहे. फ्रेंचायजीला त्याने याकडे लक्ष देण्याची सूचना केली आहे.
IPL 2024 च्या सीजनमध्ये सुरुवातीला टॉपवर असलेल्या राजस्थान रॉयल्स टीमला सलग चौथ्या पराभवाचा सामना करावा लागलाय. गुवाहाटीत राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्समध्ये सामना झाला. या मॅचमध्ये संजू सॅमसनच्या राजस्थानला पंजाब किंग्सने 5 विकेटने हरवलं. पंजाबची टीम आधीच बाहेर गेलीय. पण प्लेऑफआधी राजस्थान रॉयल्सच्या खराब फॉर्मने चाहत्यांची चिंता वाढवली आहे. या पराभवामुळे राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसनसह संपूर्ण टीम निराश होती. त्याचवेळी दुसऱ्याबाजूला माजी क्रिकेटपटू इरफान पठाण संतापलेला. त्यांच्या संतापाच कारण राजस्थानचा एक खेळाडू आहे.
राजस्थान रॉयल्सने या मॅचमध्ये पहिली बॅटिंग केली व फक्त 145 धावा केल्या. यावेळी टीमचे टॉप फलंदाज फ्लॉप ठरले. रियान परागने एकाकी झुंज देत 48 धावा केल्या. त्यामुळे टीमची धावसंख्या 145 पर्यंत पोहोचली. पंजाब किंग्सला सुद्धा या धावसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी संघर्ष करावा लागला. पण लक्ष्य जास्त मोठ नसल्याने टीमने विजय मिळवला. कॅप्टन सॅम करण पंजाबच्या या विजयाचा हिरो ठरला. त्याने 2 विकेट घेतल्या व नाबाद 61 धावा करुन टीमला विजय मिळवून दिला.
इरफान कुठल्या खेळाडूवर संतापला?
राजस्थानचा पराभव झाला. त्याचवेळी आयपीएलमध्ये कॉमेंट्री करणाऱ्या इरफान पठाणने जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली. राजस्थान टीमचा दिग्गज ओपनर जॉस बटलरबद्दल इरफानने नाराजी प्रगट केली, जो या मॅचमध्ये खेळत नव्हता. बटलर सीजन संपण्याआधीच आपल्या मायदेशी इंग्लंडला निघून गेलाय, हे इरफानच्या नाराजीमागच कारण होतं. इरफानने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केलाय. बटलरच असं अचानक माघारी परतणं चुकीच असल्याच त्याने म्हटलं आहे. “कुठलाही परदेशी खेळाडू पूर्ण सीजनसाठी उपलब्ध नसेल, तर त्याने ही गोष्ट आधी सांगितली पाहिजे. अन्यथा त्या खेळाडूची निवड करु नका सर्व फ्रेंचायजींनी याकडे लक्ष देण गरजेच आहे” असं इरफान म्हणाला.
इरफान पठाण काय म्हणाला?
जॉस बटलर राजस्थानचे शेवटचे दोन सामने आणि प्लेऑफसाठी उपलब्ध नसणार आहे. त्याचा परिणाम टीमवर होईल. “एखादा खेळाडू पूर्ण सीजन खेळण्याच आश्वासन देत असेल, तर तो शब्द त्याने पाळला पाहिजे” असं पठाण म्हणाला. इरफान पठाणने हे स्पष्ट केलं की, “देश सर्वात आधी. पण जर शब्द दिला असेल, तर संपूर्ण सीजन खेळलं पाहिजे. अन्यथा येण्याची गरज नाही”