AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs AUS 5th Test | पाचव्या आणि अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय

Ashesh Series 5th Test England vs Australia | ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम या 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशा फरकाने आघाडीवर आहे.

ENG vs AUS 5th Test | पाचव्या आणि अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय
| Updated on: Jul 27, 2023 | 4:18 PM
Share

मँचेस्टर | इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील अ‍ॅशेस सीरिज 2023 मधील पाचव्या आणि अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे. या पाचव्या सामन्याचं आयोजन हे केनिंग्टन ओव्हल लंडन इथे करण्यात आलंय. या पाचव्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून इंग्लंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. ऑस्ट्रेलिया या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. चौथा सामना ड्रॉ राहिल्याने ऑस्ट्रेलियाने प्रतिष्ठेची असलेली ही मालिका कायम राखली.

टीममध्ये मोठा बदल

आता मात्र इंग्लंडचा पाचवा सामना जिंकून मालिकेत 2-2 ने बरोबरी करण्याचा प्रयत्न असणार आहे. तर ऑस्ट्रेलिया इंग्लंड चितपट करुन मालिका विजयाच्या आशेने मैदानात उतरली आहे. या पाचव्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल केला आहे. कांगारुंनी अंतिम 11 खेळाडूंमध्ये 1 बदल केलाय.

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला

टीम मॅनेजमेंटने ऑलराउंडर खेळाडूला बाहेर बसवलंय. तर त्याच्या जागी युवा अष्टपैलूचा समावेश केलाय. कॅमरुन ग्रीन याच्या जागी टॉड मर्फी याला ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीममध्ये संधी देण्यात आली आहे.

दरम्यान इंग्लंड क्रिकेट टीमने या पाचव्या सामन्यासाठी 24 तासांआधीच प्लेईंग इलेव्हन जाहीर केली. या इंग्लंडने या प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही. टीम मॅनेजमेंटने आपल्या त्याच टीमवर विश्वास दाखवत प्लेईंग इलेव्हन कायम ठेवलीय.

ऑस्ट्रेलियाने मालिका कायम राखली

ऑस्ट्रेलियाने या मालिकेतील पहिल्या 2 सामन्यात सलग विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली. तर तिसरा सामना जिंकून इंग्लंडने मालिकेतील आव्हान कायम ठेवलं. मात्र चौथ्या सामन्यातील पाचवा दिवस हा पावसामुळे वाया गेला. त्यामुळे इंग्लंडला असलेली विजयाची संधी पावसाने हिरावून घेतली. चौथा सामना हा पावसामुळे अनिर्णित राहिला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला मालिका कायम राखण्यात यश आलं.

इंग्लंड प्लेईंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), बॅन डकॅट, झॅक क्राउली, मोईन अली, जो रूट, हॅरी ब्रूक, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, मार्क वुड, स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स एंडरसन.

ऑस्ट्रेलिया प्लेईंग इलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि टॉड मर्फी.

बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.