ENG vs IND : 31 धावांत 6 विकेट्स, भारताची पुन्हा घसरगुंडी, इंग्लंडसमोर 371 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?

England vs India 1st Test : टीम इंडियाने शुबमन गिल याच्या नेतृत्वात लीड्समध्ये इंग्लंडला विजयासाठी 371 रन्सचं टार्गेट ठेवलं आहे.

ENG vs IND : 31 धावांत 6 विकेट्स, भारताची पुन्हा घसरगुंडी, इंग्लंडसमोर 371 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?
Ben Stokes England Captain
Image Credit source: Social Media
| Updated on: Jun 23, 2025 | 11:02 PM

टीम इंडियाने इंग्लंडला पहिल्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी विजयासाठी 371 धावांचं आव्हान दिलं आहे. भारताकडे पहिल्या डावात 6 धावांची आघाडी होती. तर ऋषभ पंत आणि केएल राहुल या जोडीने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने दुसऱ्या डावात ऑलआऊट 364 धावा केल्या. अशाप्रकारे भारताने इंग्लंडसमोर 371 धावांचं आव्हान ठेवलं आहे. त्यामुळे आता भारतीय फलंदाजांनंतर गोलंदाजांवर सर्व जबाबदारी असणार आहे. तसेच चौथ्या दिवसाचा खेळ संपायला अवघे काही मिनिटं बाकी आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाज चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत किती विकेट्स घेतात? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

सामन्यात काय काय झालं?

भारतीय क्रिकेट संघाने पहिल्या डावात 471 धावा केल्या. इंग्लंडने प्रत्युत्तरात 465 रन्स केल्या. भारताने अशाप्रकारे 6 धावांची आघाडी मिळवली. त्यानंतर टीम इंडियाने तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावाला सुरुवात केली.

पहिल्या डावात 101 धावा करणारा यशस्वी जैस्वाल दुसर्‍या डावात 4 धावांवर बाद झाला. डेब्यूटंट साई सुदर्शन याने 30 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. कर्णधार शुबमन गिल यालाही पहिल्या डावाची पुनरावृत्ती करता आली नाही.शुबमन 8 रन्स करुन आऊट झाला. त्यामुळे टीम इंडियाची 3 आऊट 92 अशी स्थिती झाली. त्यानंतर ओपनर केएल राहुल आणि उपकर्णधार ऋषभ पंत या जोडीने चौथ्या विकेटसाठी 195 धावांची भागीदारी केली. ऋषभ पंत याने या या सामन्यात सलग दुसरं शतक झळकावलं. पंत 118 धावा करुन बाद झाला. तर पहिल्या डावात 42 धावा करुन माघारी परतलेल्या केएलने दुसऱ्या डावात शतक केलं. केएलने 137 रन्स केल्या. केएल आऊट झाल्याने टीम इंडियाचा स्कोअर 5 आऊट 333 असा झाला.

लीड्समध्ये कोण जिंकणार?

…आणि टीम इंडियाची घसरगुंडी

टीम इंडिया 4 आऊट 333 रन्सवर खेळत होती. मात्र इथून इंग्लंडच्या गोलंदाजांनी कमबॅक केलं आणि टीम इंडियाला झटक्यावर झटके देत ऑलआऊट केलं. टीम इंडियाने शेवटच्या 6 विकेट्स या अवघ्या 31 धावांच्या मोबदल्यात गमावल्या. त्यामुळे टीम इंडिया 400 धावांचं आव्हान ठेवण्यात अपयशी ठरली. इंग्लंडला अशाप्रकारे 371 रन्सचं आव्हान मिळालं. आता दोघांपैकी कोणता संघ हा सामना जिंकून विजयी सलामी देते? हे येत्या काही तासांतच स्पष्ट होईल.