IND vs ENG : कॅप्टन शुबमन चौथ्या कसोटीत या खेळाडूला संधी देणार! कोण आहे तो?
Eng vs Ind 4th Test : तिसऱ्या कसोटीतील पराभवानंतर आता चौथ्या सामन्यासाठी भारतीय संघात बदल होणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे. आता हेड कोच गौतम गंभीर आणि कॅप्टन शुबमन गिल हे कुणाला डच्चू देऊ शकतात आणि कुणाला संधी देणार? जाणून घ्या.

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना हा लॉर्ड्समध्ये खेळवण्यात आला. इंग्लंडने या सामन्यात भारतावर 22 धावांनी मात केली. इंग्लंडचा हा या 5 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा विजय ठरला. इंग्लंडने मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली. भारताला हा सामना जिंकता आला नाही. मात्र ध्रुव जुरेल याने त्याच्या कृतीने चाहत्यांची मनं जिंकली. ध्रुवला तिन्ही सामन्यांसाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी देण्यात आली नाही. मात्र तिसऱ्या सामन्यात ध्रुवने दुखापतग्रस्त ऋषभ पंत याच्या जागी विकेटकीपर म्हणून भूमिका पार पाडली.
चाहत्यांची मनं जिंकली
ध्रुवने या सामन्यादरम्यान चाहत्यांनी मनं जिंकली. ध्रुव मैदानाबाहेर बसलेला. तेव्हा स्टेडियममध्ये उपस्थित एका क्रिकेट चाहत्यांने ध्रुवकडे पाण्याची बॉटल मागितली. त्यानंतर ध्रुवनेही लगेचच जागेवरुन उठत चाहत्याच्या दिशेने बॉटल फेकली. त्यानंतर चाहत्यांनी ध्रुवसाठी चिअर केलं आणि त्याचा उत्साह वाढवला. ध्रुवला 3 सामने झाले तरीही संधी मिळाली नाही. मात्र आता ध्रुवला संधी मिळू शकते.
टीम इंडियाचा नियमित विकेटकीपर आणि उपकर्णधार ऋषभ पंत याला तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान दुखापत झाली. पंतला विकेटकीपिंग करताना दुखापत झाली. त्यामुळे पंतच्या चौथ्या कसोटीत खेळण्याबाबत शंका आहे. तसेच पंत चौथ्या सामन्यात फक्त बॅट्समन म्हणूनच खेळणार असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे टीम इंडियाला चौथ्या सामन्यात विकेटकीपरची आवश्यकता असणार आहे. त्यामुळे ध्रुव जुरेलला संधी मिळू शकते. ध्रुवचा करुण नायर याच्या जागी समावेश केला जाऊ शकतो. करुणला तिन्ही सामन्यांत संधी देण्यात आली. मात्र करुणने तिन्ही सामन्यांत निराशा केली. त्यामुळे करुणला डच्चू दिला जाऊ शकतो.
ध्रुवची मन जिंकणारी कृती
Dhruv Jurel gives a water bottle to an Indian fan during India vs England 3rd Test at Lord’s pic.twitter.com/S5xrGZZizq
— Cricket Live (@Cricket_live247) July 17, 2025
इंग्लंड मालिकेत आघाडीवर
दरम्यान इंग्लंड या मालिकेत आघाडीवर आहे. इंग्लंडने मालिकेतील पहिला आणि तिसरा सामना जिंकला. तर भारताने दुसरा सामना जिंकत विजयाचं खातं उघडलं. त्यामुळे इंग्लंड या मालिकेत 2-1 अशा फरकाने आघाडीवर आहे. आता टीम इंडियाला मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी चौथ्या सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळे मँचेस्टरमध्ये भारतीय संघाच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे.
