
प्रसिध कृष्णा आणि मोहम्मद सिराज या वेगवान गोलंदाजांनी अप्रतिम बॉलिंग करत इंग्लंडला पाचव्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी 250 धावांच्या आत रोखत मोठी आघाडी घेण्यापासून यशस्वीरित्या रोखलं आहे. इंग्लंडने भारताला पहिल्या डावात 224 धावांवर गुंडाळलं. त्यानंतर इंग्लंडने स्फोटक सुरुवात केली. मात्र त्यानंतर सिराज-प्रसिध जोडीने कमाल करत इंग्लंडच्या फलंदाजांना आऊट करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे इंग्लंडला पहिल्या डावात 247 धावाच करता आल्या. त्यामुळे इंग्लंडला पहिल्या डावात फक्त 23 धावांचीच आघाडी घेता आली. त्यामुळे आता भारतीय फलंदाज दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या करुन इंग्लंडसमोर डोंगराएवढं आव्हान ठेवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
टीम इंडियाला ऑलआऊट केल्यानंतर इंग्लंडच्या झॅक क्रॉली आणि बेन डकेट या सलामी जोडीने विस्फोटक सुरुवात केली. या दोघांनी चौफेर फटकेबाजी करत इंग्लंडला 90 पार पोहचवलं. डकेट आणि क्रॉली या सलामी जोडीने भारताची डोकेदुखी वाढवली होती. मात्र आकाश दीप याने डकेटला आऊट करत इंग्लंडला 92 धावांवर पहिला झटका दिला. डकेट 38 बॉलमध्ये 43 रन्स करुन आऊट झाला.
त्यानंतर प्रसिध आणि सिराज जोडीने इंग्लंडच्या एकाही जोडीला फार वेळ टिकून दिलं नाही. दोघांनीही इंग्लंडला ठराविक अंतराने झटके दिले. त्यामुळे इंग्लंडला फार मोठी धावसंख्या उभारता आली नाही. भारताने इंग्लंडला 155 धावांच्या मोबदल्यात 9 झटके दिले. इंग्लंडसाठी झॅक क्रॉली याने सर्वाधिक 64 धावा केल्या. तर हॅरी ब्रूकने 53 धावांचं योगदान दिलं. तसेच कर्णधार ओली पोप याने 22 तर जो रुट याने 29 धावा केल्या. त्याव्यतिरिक्त एकालाही दुहेरी आकडाही गाठता आला नाही.
टीम इंडियाची कडक बॉलिंग
Innings Break!
Impressive bowling display from #TeamIndia! 🙌
4⃣ wickets each for Prasidh Krishna and Mohammed Siraj
1⃣ wicket for Akash DeepScorecard ▶️ https://t.co/Tc2xpWMCJ6#ENGvIND | @prasidh43 | @mdsirajofficial pic.twitter.com/Xk7N26i5Wj
— BCCI (@BCCI) August 1, 2025
प्रसिध कृष्णा याने 16 ओव्हरमध्ये 3.90 च्या इकॉनॉमीने 62 धावा देत इंग्लंडच्या झॅक क्रॉली, जेमी स्मिथ, जेमी ओव्हरटन आणि गस एटकीन्सन याला आऊट केलं. तर मोहम्मद सिराज याने 16.2 षटकांत 86 धावांच्या मोबदल्यात कॅप्टन ओली पोप, जो रुट, हॅरी ब्रूक आणि जेकब बेथेल या चौघांना मैदानाबाहेर पाठवलं. तर आकाश दीप याने एकमेव विकेट घेत दोघांना चांगली साथ दिली.