ENG vs IND: पहिल्या कसोटीआधी टीम इंडियाला झटका, Rohit Sharma कोरोना पॉझिटिव्ह

ENG vs IND: लीसेस्टरशायर (IND vs LEI) विरुद्धच्या सराव सामन्यात रोहित शर्मा फलंदाजीला उतरला नाही. त्यामुळे क्रिकेट फॅन्सच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले.

ENG vs IND: पहिल्या कसोटीआधी टीम इंडियाला झटका, Rohit Sharma कोरोना पॉझिटिव्ह
Rohit sharma
Image Credit source: BCCI
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jun 26, 2022 | 9:15 AM

मुंबई: लीसेस्टरशायर (IND vs LEI) विरुद्धच्या सराव सामन्यात रोहित शर्मा फलंदाजीला उतरला नाही. त्यामुळे क्रिकेट फॅन्सच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. रोहित शर्मा (Rohit Sharma) कुठे आहे? त्याला दुखापत झाली का? असे प्रश्न चाहत्यांना पडले होते. अखेर रोहित शर्मा दुसऱ्याडावात फलंदाजीला का उतरला नाही? त्याचं कारण समोर आलं आहे. रोहित शर्माला कोरोनाची लागण झाली आहे. BCCI ने च टि्वट करुन ही माहिती दिली. लीसेस्टरशायर विरुद्धच्या सराव सामन्यावेळी रोहितची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. भारतीय संघ गुरुवारपासून सराव सामना खेळतोय. लीसेस्टरशायर विरुद्ध रोहित शर्मा पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरला होता. पण जेव्हा तो दुसऱ्या डावात मैदानात उतरला नाही, तेव्हा क्रिकेट फॅन्सच्या मनात प्रश्न निर्माण झाले. रोहितला दुखापत झाली का? असा प्रश्न पडला होता. पण बीसीसीआयने टि्वट करुन त्याला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट केलं.

“रोहित शर्माची शनिवारी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. सध्या तो हॉटेलात आयसोलेशनमध्ये आहे. बीसीसीआयची मेडीकल टीम त्याच्यावर लक्ष ठेवून आहे” अशी बीसीसीआयकडून टि्वटमध्ये माहिती देण्यात आली.

अन्य खेळाडूंच स्टेटस काय?

रोहित शर्मा सराव सामन्याच्या तिसऱ्यादिवशी कोरोना पॉझिटिव्ह आला. म्हणजे सराव सामन्यामध्ये त्याला कोरोनाची लागण झाली. सध्या फक्त रोहितला कोरोनाची बाधा झाली आहे. सुदैवाने अन्य खेळाडूंना या आजाराची लागण झालेली नाही.

पहिली कसोटी कधी?

लीसेस्टरशायर विरुद्धच्या या सराव सामन्यात प्रथम फलंदाजी करताना रोहितने 47 चेंडूंचा सामना केला व 3 चौकारांच्या मदतीने 25 धावा केल्या. गिलसोबत अर्धशतकी भागीदारी सुद्धा केली. रोहित 1 जुलैपर्यंत फिट होईल अशी अपेक्षा आहे. एजबॅस्टनमध्ये मालिकेतील अखेरचा कसोटी सामना आहे. मागच्यावर्षी कोविड मुळे रद्द झालेल्या मालिकेतील हा अखेरचा सामना आहे, भारतीय संघ या मालिकेत 2-1 ने पुढे आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें