ENG vs IND Test Series: टीम इंडियासमोर आव्हानही आणि संधीही, रोहितसेना इतिहास रचणार?

India Tour Of England 2025: इंग्लंड क्रिकेट बोर्डाने 22 ऑगस्ट रोजी मायदेशातील मालिकांचं वेळापत्रक जाहीर केलं.त्यानुसार टीम इंडियाला 2025 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर जावं लागणार आहे. टीम इंडियासाठी इंग्लंड दौरा हा आव्हानात्मक असणार आहे.

ENG vs IND Test Series: टीम इंडियासमोर आव्हानही आणि संधीही, रोहितसेना इतिहास रचणार?
rohit sharma and england
| Updated on: Aug 23, 2024 | 12:45 AM

टीम इंडिया सध्या जरी विश्रांतीवर असली तरी पुढील काही महिने रोहितसेना सलग अनेक मालिका खेळणार आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंसमोर स्वत:ला फिट ठेवण्यासह चांगली कामगिरी करण्याचं आव्हान असणार आहे. टीम इंडिया सप्टेंबर महिन्यात बांगलादेश विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. तसेच त्यानंतर न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडिया टेस्ट सीरिज खेळेल. न्यूझीलंड दौऱ्यानंतर टीम इंडियाची युवा ब्रिगेड दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया टी 20i मालिका खेळणार आहे. त्यानंतर टीम इंडियाचे अनुभवी शिलेदार हे बॉर्डर गावस्कर ट्रॉफसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत. त्यानंतर नववर्षात टीम इंडिया सर्वातआधी मायदेशात इंग्लंड विरुद्ध भिडणार आहे. इंग्लंड भारत दौऱ्यावर येणार आहे. टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध टी20, एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळणार आहे.

त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी आणि अनेक बऱ्याच मालिकेत टीम इंडिया खेळणार आहे. टीम इंडियाचं असं भरगच्च वेळापत्रक असताना आता टीम इंडिया 2025 वर्षात इंग्लंड दौऱ्यावर जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने गुरुवारी 22 ऑगस्ट रोजी मायदेशातील मालिकांचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 20 जून ते 4 ऑगस्ट दरम्यान ही मालिका खेळणार आहे. विशेष म्हणजे या मालिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-27 च्या साखळीला सुरुवात होणार आहे. लीड्समध्ये 20 जून 2025 पासून पहिला कसोटी सामना खेळवण्यात येईल. टीम इंडियाने 2021-2022 मध्ये विराट कोहली याच्या नेतृत्वात अखेरचा इंग्लंड दौरा केला होता.

टीम इंडियासमोर आव्हान

टीम इंडियासाठी इंग्लंड दौरा हा आव्हानात्मक असा असणार आहे. तसेच टीम इंडियासाठी इंग्लंड दौरा आव्हानांसह संधीचा आहे.टीम इंडियाला गेल्या 17 वर्षात इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. टीम इंडियाने इंग्लंडमध्ये अखेरची कसोटी मालिका ही 2007 साली जिंकली होती. तेव्हापासून भारतीय क्रिकेट चाहत्यांना टीम इंडियाच्या इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिका विजयाची प्रतिक्षा आहे. टीम इंडियाला गेल्या इंग्लंड दौऱ्यात मालिका विजयाची संधी होती. टीम इंडिया 2021-22 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर होती. तेव्हा 4 सामन्यांची मालिका ही 2-2 ने बरोबरीत राहिली होती. तसेच टीम इंडियाला गेल्या मालिकेत 2-1 अशा फरकाने आघाडीवर होती. मात्र टीम इंडियाला शेवटच्या सामन्यात पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे मालिका बरोबरीत राहिली.

टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याचं वेळापत्रक

तसेच टीम इंडियाचा दोन्ही वेळा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पराभव झालाय. हे दोन्ही अंतिम सामने इंग्लंडमध्येच खेळवण्यात आले होते. त्यामुळे टीम इंडियाची इंग्लंड दौऱ्यात खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे, हे निश्चित आहे.