मोठी बातमी! बंगालच्या खाडीत मोठा धमाका, अनेक किलोमीटरपर्यंत हादरा, चीनसह पाकड्यांनी..
मागील काही वर्षांपासून भारत आपली संरक्षण ताकद वाढवताना दिसत आहे. देशाच्या सुरक्षेबद्दल कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नसल्याचे भारताने अगोदरच स्पष्ट केलंय. त्यामध्येच भारताने असे काही केले की, शेजारी देशांची झोप उडाली आहे.

भारत मागील काही दिवसांपासून आपली लष्करी ताकद वाढवताना दिसत आहे. चीन, पाकिस्तान आणि आता बांगलादेशही भारताच्या विरोधात भूमिका घेताना दिसत आहे. यामुळे भारत अलर्ट मोडवर आहे. सुरक्षेसंदर्भात कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे भारताने अगोदरच स्पष्ट केले. भारताने बंगालच्या उपसागरातून समुद्रातून जाणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. भारताने या चाचणीच्या माध्यमातून जगाला दाखवून दिले की, भारत आता जमीन, हवा आणि समुद्रावरून शत्रूच्या टार्गेटवर अणुहल्ला कशाही प्रकारे करू शकतो. ही चाचणी विशाखापट्टणमच्या किनाऱ्याजवळ घेण्यात आली. मात्र, त्याची श्रेणी किंवा प्रकारांबद्दल कोणतीही माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. संरक्षण तज्ञांच्या मते, हे के-4 एसएलबीएम क्षेपणास्त्र असू शकते.
रिपोर्टनुसार, क्षेपणास्त्र मारा स्वदेशी बनावटीच्या आयएनएस अरिहंत या अणुशक्तीवर चालणाऱ्या पाणबुडीतून करण्यात आला असावा, हा फक्त अंदाज आहे. याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली. ही पुढच्या पिढीच्या K-5 क्षेपणास्त्राची चाचणी होती. मिळालेल्या माहितीनुसार, K-4 क्षेपणास्त्राला मुख्य ओळखले जाते. ही चाचणी 23 तारखेच्या सकाळी झाली, असा दावाही करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून भारताने बॅलिस्टिक क्षेपणास्त्र चाचणी कार्यक्रम अधिक तीव्र केला आहे.
गेल्या वर्षी भारताने बंगालच्या उपसागरात अण्वस्त्रवाहू K-4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. या चाचणीमुळे भारताने दुसऱ्यांदा हल्ला करण्याची क्षमता प्राप्त केली आहे. एका मागून एक चाचण्या या भारताकडून केल्या जात आहेत, यामुळे मोठी खळबळ उडाली असीन भारताच्या शेजारी देशांची झोप उडाली आहे. भारताने दक्षिण आशियामध्ये एक खास ताकद नक्कीच मिळवली आहे.
विशेष बाब म्हणजे K-4 भारताने स्वदेशी बनावटीने विकसित केले आहे. पाणबुडीतून प्रक्षेपित केली जाणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (SLBM) आहे, जी डीआरडीओने विकसित केली आहे. हे अणुवस्त्र वाहून नेण्यास सक्षम असलेले क्षेपणास्त्र आयएनएस अरिहंत आणि आयएनएस अरिघाटसारख्या अरिहंत-श्रेणीच्या पाणबुड्यांमधून प्रक्षेपित केले जाते. यामुळे भारताला एक वेगळी ताकद नक्कीच मिळाली आहे.
