AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सक्षम ताटेची आई अन् गर्लफ्रेंड आचल मामीडवारने उचललं टोकाचं पाऊल; थेट पोलीस स्टेशनमोर…घटनेनं खळबळ!

सक्षम ताटे आत्महत्या प्रकरणात खळबळजनक माहिती समोर आली आहे. सक्षमची आई आणि त्याची प्रेयसी आचल या दोघींनी टोकाचे पाऊल उचलण्यचा प्रयत्न केला आहे.

सक्षम ताटेची आई अन् गर्लफ्रेंड आचल मामीडवारने उचललं टोकाचं पाऊल; थेट पोलीस स्टेशनमोर...घटनेनं खळबळ!
saksham tate murder caseImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 24, 2025 | 7:19 PM
Share

Saksham Tate Murder Case : राज्यभर गाजलेल्या सक्षम ताटे खून प्रकरणी पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी करत आज (24 डिसेंबर) सक्षम ताटेची प्रेयसी आचल मामीडवार आणि आणि सक्षमच्या आईने आत्मदहनाचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून दोघींनीही स्वत:ला पेटवण्याचा प्रयत्न केला. परंतु उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवल्याने अनर्थ टळला. यावेळी आचल मामीडवार आणि उपस्थित सक्षम ताटेच्या कुटुंबासोबत पोलिसांचा वाद झाल्याचे पाहायला मिळाली. यावेळी धक्काबुक्कीदेखील झाली.

पोलिसांनी हत्या करण्यास परावृत्त केल्याचा आरोप

नांदेड शहरातील जुनागंज भागात सक्षम ताटे या युवकाची 27 नोव्हेंबर रोजी हत्या करण्यात आली होती. आंतरजातीय प्रेम प्रकरणातून आचल मामीडवारच्या वडिलांनी आणि भावांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत सक्षमची हत्या केली होती. या प्रकरणातील सर्व आरोपी सध्या तुरुंगात आहेत. मात्र घटनेच्या दिवशी इतवारा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी माही दासरवाड, धीरज कोमूलवाड यांनी आचलच्या अल्पवयीन भावाला सक्षमची हत्या करण्यासाठी परावृत्त केले, असा आरोप ताटेचे कुटुंबीय तसेच आचल यांनी केला आहे. सक्षम तुझ्या बहिणीला रोज घेऊन फिरतो आधी त्याला मार आणि नंतर पोलीस स्टेशनला ये असं हे पोलीस कर्मचारी म्हणाले असा आचलचा दावा आहे.

अद्याप कारवाई न झाल्याने टोकाचा निर्णय

याच पोलिसांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आचल मामीडवार आणि सक्षम ताटे याच्या कुटुंबीयांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, विशेष पोलीस महानिरीक्षक यांना निवेदन देऊन पोलिसांवर कारवाईची मागणी करण्यात आली होती. आचल तसेच ताटेच्या आईे आत्मज्ञानाचा इशारादेखील दिला होता. परंतु अद्याप कारवाई न झाल्याने आज आचल मामीलवार आणि आणि सक्षम ताटे त्याच्या आईने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. आजच कारवाई झाली नाही तर पुन्हा आम्ही आमचे जीवन संपवू असा इशारा आचल मामीडवार आणि सक्षम ताटे त्याच्या आईने दिला. त्यामुळे या प्रकरणात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आचल आणि सक्षमच्या आईने आत्महदहनाचा प्रयत्न केल्यानंतर घटनास्थळी काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.