भाजपाने डाव टाकला, एकत्र येताच ठाकरे बंधूंना मोठा दणका, अनेकांच्या हाती कमळ
Incoming in BJP : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येत युतीची घोषणा केली आहे. एकीकडे युतीची घोषणा होत असताना भाजपाने या दोन्ही पक्षांना मोठा दणका दिला आहे. अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक नेते पक्षांतर करताना दिसत आहेत. त्यामुळे अनेक पक्षांची राजकीय समीकरणं बदलताना दिसत आहेत. आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येत युतीची घोषणा केली आहे. दोन्ही पक्षांनी महायुतीसोबत एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे युतीची घोषणा होत असताना भाजपाने या दोन्ही पक्षांना मोठा दणका दिला आहे. ठाकरे गटाच्या आणि मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंना मोठा दणका बसला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
उल्हासनगरमध्ये ठाकरे गटाला धक्का
उल्हासनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उल्हासनगरचे माजी उपमहापौर व माजी सभागृह नेते धनंजय बोडारे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यांच्यासह माजी नगरसेविका वसुधाताई बोडारे, शितलताई बोडारे, ओमी कलानी गटाचे माजी नगरसेवक नाना बिराडे यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यावेळी या मान्यवरांचे पक्षात स्वागत केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार कुमार आयलानी, उल्हासनगरचे भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, प्रदीप राजानी, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांच्यासह भाजपाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
🪷 तुमची आमची भाजपा सर्वांची 🪷
आदरणीय मोदीजी व आदरणीय देवेंद्रजींच्या विकासाभिमुख कार्यशैलीने प्रेरित होऊन उल्हासनगरचे माजी उपमहापौर व माजी सभागृह नेते धनंजय बोडारे (उबाठा) यांनी भाजपा परिवारात प्रवेश केला.
पक्षप्रवेश करणाऱ्या मान्यवरांमध्ये माजी नगरसेविका वसुधाताई बोडारे,… pic.twitter.com/4SYHaPXxby
— Ravindra Chavan (@RaviDadaChavan) December 24, 2025
पनवेलमध्ये मनसेला मोठा धक्का
दुसरीकडे पनवेलमध्ये मनसेला मोठा धक्का बसला आहे. मनसेचे पनवेल महानगर संघटक तानाजी पिसे, नवीन पनवेलचे शहराध्यक्ष प्रथमेश गवळी, विद्यार्थी सेना विभाग अध्यक्ष रोहन गवळी, पदाधिकारी केनेथ देवासगयम यांनी भाजपात प्रवेश केला आहे. या पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश देताना रवींद्र चव्हाण यांनी भाजपा परिवाराच्या विकासाभिमुख व पारदर्शक कार्यशैलीने प्रेरित होऊन हे पदाधिकारी प्रवेश करत असल्याची माहिती दिली.
🪷 तुमची आमची भाजपा सर्वांची 🪷
भाजपा परिवाराच्या विकासाभिमुख व पारदर्शक कार्यशैलीने प्रेरित होऊन भाजपा परिवारात प्रवेश करणाऱ्यांचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे.
याच पार्श्वभूमीवर मनसेचे पनवेल महानगर संघटक तानाजी पिसे, नवीन पनवेलचे शहराध्यक्ष प्रथमेश गवळी, विद्यार्थी सेना विभाग… pic.twitter.com/XzUZ2j5967
— Ravindra Chavan (@RaviDadaChavan) December 24, 2025
दरम्यान, आज शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी युतीची घोषणा केली आहे. त्यामुळे आता या दोन्ही पक्षांची ताकद वाढली आहे. महायुतीविरोधात लढण्यासाठी हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत.
