ENG vs NEP Live Streaming : इंग्लंड रोहितच्या टीम विरुद्ध भिडणार, प्लेइंग ईलेव्हन जाहीर, सामना किती वाजता?

England vs Nepal T20 World Cup 2026 Live Match Score : इंग्लंड क्रिकेट टीमने पंरपरेनुसार सामन्याच्या 24 तासांआधी प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. टीम मॅनेजमेंटने नेपाळ विरुद्धच्या या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये 4 खेळाडूंना संधी दिलेली नाही. जाणून घ्या त्या चौघांची नावं.

ENG vs NEP Live Streaming : इंग्लंड रोहितच्या टीम विरुद्ध भिडणार, प्लेइंग ईलेव्हन जाहीर, सामना किती वाजता?
England Cricket Team
Image Credit source: @englandcricket X Account
| Updated on: Feb 08, 2026 | 12:27 AM

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील दुसऱ्या दिवशी अर्थात रविवारी 8 फेब्रुवारीला एकूण 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. रविवारी होणाऱ्या एकूण दुसऱ्या तर स्पर्धेतील पाचव्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध नेपाळ आमेनसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा या मोहिमेतील पहिलाच सामना असणार आहे. हॅरी ब्रूक इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. तर रोहित पौडेल याच्याकडे नेपाळच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. इंग्लंडने टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत नेपाळ विरूद्धच्या सामन्यानिमित्ताने आपली परंपरा कायम राखली आहे. इंग्लंडने या मोहिमेतील आपल्या पहिल्या सामन्यासाठी आपल्या शिलेदारांची नावं जाहीर केली आहेत.इंग्लंडने नेपाळ विरूद्धच्या सामन्यासाठी 24 तासांआधीच प्लेइंग ईलेव्हनची घोषणा केली आहे. इंग्लंड क्रिकेटकडून एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

4 खेळाडूंना डच्चू

टीम मॅनेजमेंटने पहिल्या सामन्यासाठी जोश टंग, रेहमान अहमद, जेमी ओव्हरटन आणि बेन डकेट या चौघांना प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी दिलेली नाही. त्यामुळे या चौघांना मैदानात खेळण्यासाठी पुढील सामन्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे. तसेच संधी मिळालेली खेळाडू कशी कामगिरी करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हा सामना कधी आणि कुठे पाहता येणार? हे जाणून घेऊयात.

इंग्लंड विरुद्ध नेपाळ सामना कधी?

इंग्लंड विरुद्ध नेपाळ सामना रविवारी 8 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे.

इंग्लंड विरुद्ध नेपाळ सामना कुठे?

इंग्लंड विरुद्ध नेपाळ सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

इंग्लंड विरुद्ध नेपाळ सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

इंग्लंड विरुद्ध नेपाळ सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होईल. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

इंग्लंड विरुद्ध नेपाळ सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

इंग्लंड विरुद्ध नेपाळ सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

इंग्लंड विरुद्ध नेपाळ सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

इंग्लंड विरुद्ध नेपाळ सामना जिओहॉटस्टार एपद्वारे लॅपटॉप, मोबाईल आणि टीव्हीवर लाईव्ह पाहायला मिळेल.

इंग्लंडचे 11 शिलेदार पहिल्या सामन्यासाठी सज्ज

बटलरच्या कामगिरीकडे लक्ष

जोस बटलर हा इंग्लंडचा विद्यमान संघातील सर्वात अनुभवी फलंदाज आहे. त्यामुळे जोस बटलर तुलनेत नवख्या संघाविरुद्ध कशी कामगिरी करतो याकडे क्रिकेट चाहत्यांंचं लक्ष असणार आहे.

नेपाळ विरूद्धच्या सामन्यासाठी इंग्लंडची प्लेइंग ईलेव्हन : फिलिप सॉल्ट, जोस बटलर (विकेटकीपर), जेकब बेथेल, टॉम बँटन, हॅरी ब्रूक (कर्णधार), सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, ल्यूक वुड