ENG vs NZ : हा झेल पाहिलात का? ग्लेन फिलिप्सने पकडलेला कॅच पाहून विश्वासच बसणार नाही! Watch

न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु असून दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला. दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ मजबूत स्थितीत दिसत आहे. पण या सामन्यात ग्लेन फिलिप्सच्या एका कॅचने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. असा झेल पकडला की विश्वास बसत नाही.

ENG vs NZ : हा झेल पाहिलात का? ग्लेन फिलिप्सने पकडलेला कॅच पाहून विश्वासच बसणार नाही! Watch
| Updated on: Nov 29, 2024 | 2:38 PM

न्यूझीलंडचा पहिल्या डावाचा खेळ दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात 348 धावांवर आटोपला. त्यानंतर या धावांचा पाठलाग करण्यासाठी इंग्लंडचा संघ मैदानात उतरला. इंग्लंडचा संघ 71 धावांवर असताना 4 गडी तंबूत परतले होते. त्यामुळे टीमची अवस्था बिकट झाली होती. जॅक क्राउले आणि जो रूटला तर आपलं खातंही खोलता आलं नाही. तर जेकॉब बेथेल 10 धावा करून तंबूत परतला. बेन डकेट 46 धावा करून बाद झाला आणि दडपण वाढलं. त्यामुळे हॅरी ब्रूक आणि ओली पोपवर सर्व जबाबदारी आली. दोघांनी मिळून 151 धावांची भागीदारी केली. ओली पोपने 77 धावा करत मैदानात तग धरून बसला होता. त्यामुळे न्यूझीलंडचं टेन्शन वाढलं होतं. त्यामुळे ही जोडी फोडण्याचं मोठं आव्हान होतं. पण ग्लेन फिलिप्सने पोपचा अप्रतिम झेल पकडला आणि त्याचा डाव संपुष्टात आणला. झेल पाहिला तर डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. असं कसं झालं अशी म्हणण्याची वेळ मैदानात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांवर आली.

टिम साउदीच्या गोलंदाजीवर ओली पोपने कट शॉट मारत धावा करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न अंगलट आला असंच म्हणावं लागेल. ग्लेन फिलिप्स एकदम तरबेज खेळाडू आहे. त्याच्याकडून चेंडू निसटणं खूपच कठीण आहे. अशा स्थितीत त्याच्या बाजूने चेंडू मारणं ओली पोपला महागात पडलं. कारण ग्लेन फिलिप्स उडी घेत त्याचा अप्रतिम झेल पकडला. चेंडूचा स्पीड आणि त्याचं उडी मारण्याचं टायमिंग एकदम जुळून आलं. काही क्षण ओली पोपला कळलंच नाही. पण तंबूत परतण्याशिवाय पर्याय नव्हता.

न्यूझीलंडने पहिल्या डावात सर्व गडी बाद 348 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने 5 गडी गमवून 319 धावा केल्या आहेत. अजूनही न्यूझीलंडकडे 29 धावांची आघाडी आहे. मात्र इंग्लंडकडे पाच खेळाडू अजून फलंदाजी करणार आहे. त्यामुळे तिसऱ्या दिवशी ही आघाडी मोडून निघेल यात शंका नाही. त्यात हॅरी ब्रूकने मैदानात जम बसवला आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा हॅरी ब्रूक 163 चेंडूत नाबाद 132 धावांवर खेळत आहे. तर बेन स्टोक्स नाबाद 37 धावांवर खेळत आहे.