AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs NZ: सामना सुरू असताना न्यूझीलंड संघाने प्लेइंग 11 बदलली, असं कसं झालं ते जाणून घ्या

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात तिसरा कसोटी सामना सुरू आहे. हा सामना मालिकेचा निर्णय ठरवणार आहे. असं असताना या सामन्यात न्यूझीलंडला धक्का बसला आहे. लाईव्ह सामन्यात प्लेइंग 11 बदलण्याची वेळ आली. चला जाणून घेऊयात..

ENG vs NZ: सामना सुरू असताना न्यूझीलंड संघाने प्लेइंग 11 बदलली, असं कसं झालं ते जाणून घ्या
ENG vs NZ: सामना सुरू असताना न्यूझीलंड संघाने प्लेइंग 11 बदलली, असं कसं झालं ते जाणून घ्याImage Credit source: GETTY IMAGES
| Updated on: Jun 27, 2026 | 5:02 PM
Share

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात मालिकेतील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना ट्रेंट ब्रिज येथे खेळला जात आहे. हा सामना मालिका कोणाच्या खिशात जाणार किंवा ड्रॉ होणार ते ठरवणार आहे. या मालिकेतील दोन सामन्यानंतर 1-1 अशी स्थिती आहे. असं असताना या सामन्यात न्यूझीलंडला सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज ब्लेयर टिकनरच्या डोक्याला चेंडू लागल्याने या सामन्यातून आऊट झाला आहे. त्यामुळे न्यूझीलंड क्रिकेटने अधिकृतपणे त्याच्या जागी 24 वर्षीय युवा वेगवान गोलंदाज जॅक फॉर्क्सला कनकशन सब्स्टीट्यूट म्हणून निवड केली आहे. यासह कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कनकशन सब्स्टीट्यूट नियम वापरणारा न्यूझीलंड हा जगातील पहिला देश ठरला आहे. तसेच फॉर्क्सला पहिला खेळाडू होण्याचा मान मिळाला आहे.

जोफ्रा आर्चरचा चेंडूवर खेळताना टिकनर चाचपडला

तिसऱ्या कसोटी सामन्यात ब्लेयर टिकनर 10व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता. ब्लेयर टिकनर 2 चेंडू खेळून एका धावेवर होता. त्यानंतर पुढच्या षटकात म्हणजेच 115 व्या षटकात त्याचा सामना जोफ्रा आर्चरशी झाला. पहिला चेंडू निर्धाव गेला. पण दुसऱ्या चेंडूवर आखुड टप्प्याचा वेगवान चेंडू टाकला. हा चेंडू खेळताना टिकनर चाचपडला आणि चेंडू थेट त्याच्या हेल्मेटवर आदळला. चेंडू लागल्यानंतर तात्काळ फिजिओ मैदाना आले आणि कनकशन टेस्ट केली. त्यानंतरही टिकनरने फलंदाजी सुरू ठेवली आणि 6 चेंडूत 4 धावा करून नाबाद राहिला. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर बेन सीयर्स बाद झाला आणि न्यूझीलंडचा डाव 438 धावांवर आटोपला.

ब्लेयर टिकनर इतकं सर्व झाल्यानंतरही गोलंदाजी मैदानात उतरला. त्याने तीन षटकं टाकली आणि विना विकेट घेता 21 धावा दिल्या. पण टी ब्रेक दरम्यान टिकनरचं डोकं गरगरायला लागलं आणि उल्टीसारखं वाटलं. त्यामुळे व्यवस्थापनाने त्याला तात्काळ आराम देण्याचा आणि सामना न खेळण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रेफरी अँडी पायक्रॉफ्टने जॅक फॉर्क्सला लाइक फॉर लाइक रिप्लेसमेंट म्हणून खेळण्याची परवानगी दिली. जॅक फॉर्क्सला या सामन्यात गोलंदाजी करता येणार आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा