AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs SL: मिलन रथनायकेची इंग्लंड विरुद्ध शानदार सुरुवात, पदार्पणात झुंजार अर्धशतक

England vs Sri Lanka 1st Test: श्रीलंकेचा पदार्पणवीर मिलन रथनायके याने इंग्लंड विरुद्ध शानदार अर्धशतकी खेळी केली आहे. मिलनने केलेल्या खेळीमुळे श्रीलंकेला 200 पार मजल मारता आली.

ENG vs SL: मिलन रथनायकेची इंग्लंड विरुद्ध शानदार सुरुवात, पदार्पणात झुंजार अर्धशतक
Milan Rathnayake sri lanka
| Updated on: Aug 21, 2024 | 10:06 PM
Share

श्रीलंकेच्या मिलन रथनायके याने कसोटी पदार्पणात शानदार सुरुवात केली आहे. मिलन रथनायकेने इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्याच दिवशी टीम अडचणीत असताना झुंजार खेळी केली. रथनायकेने पदार्पणात अर्धशतक ठोकत खास कामगिरी केली. तसेच रथनायकेच्या झुंजार खेळीसह श्रीलंकेने 200 पार मजल मारली. श्रीलंकेने इंग्लंड विरुद्ध टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र श्रीलंकेच्या टॉप ऑर्डरमधील फलंदाज इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर अपयशी ठरले. मात्र त्यानंतर रथनायके याने सहकाऱ्यांना चांगली साथ देत श्रीलंकेचा डाव सावरला. त्यामुळे श्रीलंकेला 200 धावांपर्यंत पोहचता आलं.

रथनायकेने 59 व्या ओव्हरमधील शेवटच्या अर्थात सहाव्या बॉलवर सिक्स ठोकत पहिलंवहिलं अर्धशतक शानदार पद्धतीने पूर्ण केलं. रथनायेकेने हे अर्धशतक 96 बॉलमध्ये 6 चौकारांच्या मदतीने पूर्ण केलं. रथनायकेचा अर्धशतकादरम्यान स्ट्राईक रेट हा 55.21 असा होता. रथनायके अर्धशतकानंतर चांगल्या पद्धतीने खेळत होता. त्यामुळे रथनायकेला शतकाची संधी होती. मात्र त्याला पदार्पणात शतक करता आलं नाही. रथनायकेचं शतक 28 धावांनी हुकलं. रथनायेकेने 53.33 च्या स्ट्राईक रेटने 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 135 चेंडूंमध्ये 72 धावा केल्या. रथनायकेने या खेळीदरम्यान आठव्या आणि नवव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली.

रथनायकेने कॅप्टन धनंजय डी सिल्वा याच्यासह आठव्या विकेटसाठी 98 बॉलमध्ये 63 रन्सची पार्टनरशीप केली. तर नवव्या विकेटसाठी विश्वा फर्नांडोसह 50 धावा जोडल्या. त्यानंतर रथनायके आऊट झाला. शोएब बशीर याने रथनायेकेला ख्रिस वोक्स याच्या हाती कॅच आऊट केलं.

मिलन रथनायकेची अर्धशतकी खेळी

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ऑली पोप (कॅप्टन), डॅनियल लॉरेन्स, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, मॅथ्यू पॉट्स, मार्क वुड आणि शोएब बशीर.

श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजया डी सिल्वा (कर्णधार), दिमुथ करुणारत्ने, निशान मदुष्का, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडिमल (विकेटकीपर), कामिंदू मेंडिस, प्रभात जयसूर्या, असिथा फर्नांडो, विश्व फर्नांडो आणि मिलन रथनायके.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.