श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या कसोटीसाठी इंग्लंड संघात बदल, व्हाईटवॉश देण्यासाठी अशी आखली रणनिती
इंग्लंड श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील दोन सामने पार पडले असून इंग्लंडने 2-0 ने मालिका खिशात घातली आहे. तर तिसरा सामना जिंकून व्हाईटवॉश देण्याचा प्रयत्न आहे. यासाठी इंग्लंड संघाने प्लेइंग 11 मध्ये बदल केला आहे. एका 20 वर्षीय खेळाडूवर डाव लावला आहे.
श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका इंग्लंडने आधीच खिशात घातली आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने 2-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे तिसरा सामना हा औपचारिक असणार आहे. असं असलं तरी इंग्लंड तिसरा सामना जिंकून श्रीलंकेला व्हाईटवॉश देण्याच्या प्रयत्नात आहे. तिसरा कसोटी 6 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. पण या सामन्यापूर्वीच इंग्लंडने आपली रणनिती आखली आहे. तिसऱ्या कसोटी संघात बदल केला आहे. मॅथ्यू पॉटच्या जागी प्लेइंग 11 मध्ये जोस हलला संधी दिली आहे. जोस हलला इंग्लंड संघाच्या तिन्ही फॉर्मेटसाठी निवडलं आहे. काउंटी चॅमियनशिपमध्ये लीसेस्टरशायरकडून खेळतो. त्याने 10 फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 16 विकेट घेतल्या आहेत. तसेच लिस्ट ए सामन्यात 17 विकेट आहेत. त्याचबरोबर 21 टी20 सामन्यात 24 विकेट आहेत.
तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग 11:
डॅन लॉरेंस, बेन डकेट, ओली पोप (कर्णदार), जो रूट, हॅरी ब्रुक (उपकर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस एटकिंसन, ऑली स्टोन, जोश हल, शोएब बशीर.
Ready to round off the Test summer in style ✨
Let’s do this, @Joshhull04_ 👊 pic.twitter.com/sfcgbnhfwo
— England Cricket (@englandcricket) September 4, 2024
पहिला कसोटी सामना
पहिल्या कसोटी सामन्यात नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण श्रीलंकेचा संपूर्ण संघ अवघ्या 236 धावांवर तंबूत परतला. इंग्लंडने 358 धावा करत 122 धावांची आघाडी घेतली. श्रीलंकेने ही आघाडी मोडत 326 धावा केल्या आणि विजयासाठी 204 धावांचं आव्हान दिलं. इंग्लंडने हे आव्हान 5 गडी गमवून पूर्ण केलं.
दुसरा कसोटी सामना
दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी घेतली. इंग्लंडने पहिल्या डावात 10 गडी गमवून 427 धावा केल्या. तर श्रीलंकेचा संपूर्ण संघ 196 धावांवर तंबूत परतला. यामुळे इंग्लंडला 231 धावांची मजबूत आघाडी मिळाली. त्यात इंग्लंडने 251 धावांची भर घातली आणि 482 धावांचं आव्हान दिलं. श्रीलंकेचा संघ 292 धावा करू शकला आणि 190 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं.