AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : कर्ज देण्यापूर्वी किंवा घेण्यापूर्वी चाणक्य यांच्या या गोष्टी लक्षात असू द्या

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, ते म्हणतात माणसानं कधीच कर्ज घेऊ नये, मात्र जर कर्ज घेण्याची वेळ आली तर काय काळजी घ्यावी? आणि जर एखाद्या व्यक्तीला कर्ज देणार असाल तर कोणत्या गोष्टी तपासाव्यात याबद्दल चाणक्य यांनी सांगितलं आहे.

Chanakya Niti : कर्ज देण्यापूर्वी किंवा घेण्यापूर्वी चाणक्य यांच्या या गोष्टी लक्षात असू द्या
चाणक्य नीती Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 22, 2025 | 5:59 PM
Share

चाणक्य हे एक कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी राज्यकारभार कसा असावा? आणि राजानं काय काळजी घ्यावी? याबद्दल आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. मात्र त्याचसोबत चाणक्य हे एक अर्थतज्ज्ञ देखील होते. पैशांचं नियोजन कसं करावं? पैसा कुठे खर्च करावा? पैसा कुठे खर्च करू नये? पैशांची बचत कशी करावी? याबद्दल चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. अनेकदा परिस्थिती अशी येते की माणूस अडचणीत सापडतो. त्याची आर्थिक परिस्थिती खालावते, कर्ज घेतल्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय नसतो, मात्र अशी परिस्थिती आल्यानंतर कर्ज घेताना काय काळजी घ्यावी? कोणाकडून कर्ज घ्यावं? तसेच तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला कर्ज देणार असाल तर ते देताना काय काळजी घ्यावी? म्हणजे तुमची फसवणूक होणार नाही, याबद्दल देखील चाणक्य यांनी काही गोष्टी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत, त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहेत.

कर्ज घेताना काय काळजी घ्यावी? – चाणक्य म्हणतात माणसानं शक्यतो कर्ज घेऊच नये, मात्र जर तुमच्यावर कर्ज घेण्याची वेळ आलीच तर सर्वात आधी तुम्हाला किती पैशांची गरज आहे, ते एकदा ठरवा, त्यापेक्षा अधिक एकही रुपयाचं अधिक कर्ज घेऊ नका, तसेच तुम्ही ज्या कामासाठी कर्ज काढले आहेत, ते पैसे त्याच कामासाठी वापरा, कर्ज काढलेल्या पैशांची उधळपट्टी करू नका, अन्यथा तुम्ही संकटात याल, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. चाणक्य पुढे असेही म्हणतात की तुम्ही ज्या व्यक्तीकडून कर्ज घेणार असाल तर सर्वात आधी तो किती विश्वासू आहे, ही गोष्ट लक्षात घ्या, तो तुमची फसवणूक करणार नाहीना हे देखील तपासा.तसेच तुमची कर्ज फेडण्याची क्षमता किती आहे, त्यावरच कर्ज किती घ्यायचं ते ठरवा, असा सल्ला चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये दिला आहे.

कर्ज देताना काय काळजी घ्यावी- चाणक्य म्हणतात तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला कर्ज देणार असाल तेव्हा त्या माणसाची कर्ज फेडण्याची किती क्षमता आहे, तो तुमची फसवणूक तर करणार नाही ना? या गोष्टी लक्षात घ्या, तसेच तुमच्यापेक्षा अधिक बलवान असलेल्या किंवा अप्रामाणिक मानसांना कधीही कर्ज देण्याची चूक करू नका, कारण त्यामुळे तुमची फसवणूक होण्याची शक्यता असते, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर प्रकरणात काय बोलणार?