
इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील चौथा कसोटी सामना हा अनिर्णित राहिला. भारतीय संघाने इंग्लंडच्या दुसर्या डावातील 311 च्या प्रत्युत्तरात पाचव्या दिवसापर्यंत 4 बाद 425 धावा केल्या. भारताने यासह इंग्लंडच्या तोंडातील विजयाचा घास हिसकावला आणि सामना यशस्वीरित्या बरोबरीत राखला. त्यानंतरही इंग्लंड मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. आता मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना हा लंडनमधील केनिंग्टन ओव्हल येथे होणार आहे. या सामन्याचा थरार 31 जुलैपासून रंगणार आहे. या सामन्यासाठी यजमान इंग्लंडने 3 दिवसआधीच संघ जाहीर केला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.
इंग्लंडने पाचव्या कसोटीसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केलाय. बेन स्टोक्स इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. इंग्लंडने या सामन्यासाठी फक्त एकाच खेळाडूचा समावेश केला आहे. इंग्लंडने ऑलराउंडर जेमी ओव्हटन याला संधी दिली आहे. जेमीचं यासह तब्बल 3 वर्षांनंतर संघात कमबॅक झालं आहे.
जेमीने 2022 साली कसोटी पदार्पण केलं होतं. जेमीने न्यूझीलंड विरुद्ध लीड्समध्ये पदार्पण केलं होतं. जेमीने त्या सामन्यात 2 विकेट्स घेण्यासह 97 धावा करत उल्लेखनीय कामगिरी केली होती. मात्र त्यानंतर जेमीला संघातून बाहेर करण्यात आलं. त्यानंतर आता जेमीचं 3 वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर पुनरागमन झालं आहे. आता इंग्लंड टीम मॅनेजमेंट जेमीला पाचव्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी देते का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
दरम्यान भारतीय संघाचा उपकर्णधार आणि विकेटकीपर ऋषभ पंत याला दुखापतीमुळे पाचव्या कसोटी सामन्यातून बाहेर व्हावं लागलं आहे. चौथ्या कसोटी सामन्यानंतर बीसीसीआयने याबाबतची माहिती दिली. पंतला चौथ्या सामन्यात फलंदाजीदरम्यान फटका मारताना दुखापत झाली. पंतच्या पायावर बॉल आदळला. त्यामुळे फ्रॅक्चर झालं. त्यामुळे पंतला पाचव्या सामन्याला मुकावं लागलं आहे. पंतच्या जागी एन जगदीशन याचा संघात समावेश करण्यात आला आहे.
इंग्लंड पाचव्या कसोटीसाठी सज्ज
We’ve made one addition to our squad for the 5th Rothesay Test, which starts at the Kia Oval on Thursday.
See the squad 👇
— England Cricket (@englandcricket) July 28, 2025
टीम इंडिया विरूद्धच्या पाचव्या कसोटीसाठी इंग्लंडचा 15 सदस्यीय संघ : बेन स्टोक्स (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, झॅक क्रॉली, लियाम डॉसन, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, ओली पोप, जो रूट, जेमी स्मिथ, जोश टंग आणि ख्रिस वोक्स.