AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंग्‍लंडच्या संघाने दोन दिवसांत जिंकला कसोटी सामना, ‘या’ खेळाडूने 6 चेंडूत 4 विकेट्स घेत केली कमाल

कसोटी सामना म्हटलं की तो पाच दिवसांचा असतो. कधी कधी 2-3 दिवसांतही निर्णय लागतो. पण इंग्लंडच्या संघाने एका कसोटी सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला केवळ दोन दिवसांत धुळ चारत विजय मिळवला होता.

इंग्‍लंडच्या संघाने दोन दिवसांत जिंकला कसोटी सामना, 'या' खेळाडूने 6 चेंडूत 4 विकेट्स घेत केली कमाल
कसोटी सामना (प्रतिकात्मक फोटो)
| Edited By: | Updated on: Aug 18, 2021 | 11:04 AM
Share

लंडन : इंग्लंडचा संघ अगदी पूर्वीपासून कसोटी क्रिकेटला खूप महत्त्व देत असल्याचं आपण पाहिलं आहे. मग ते विविध देशांचे दौरे असो किंवा ऑस्ट्रेलियाविरुद्धची मानाची एशेस सिरीज. अनेक वर्ष कसोटी क्रिकेट खेळल्याने इंग्लंड संघाने काही अप्रतिम विजयही स्वत:च्या नावे केले आहेत. यातीलच एक विजय म्हणजे पाच दिवसांचा कसोटी सामना अवघ्या दोन दिवसांत संपवून इंग्लंड संघाने वेस्ट इंडिजवर दमदार विजय मिळवला होता. इंग्‍लंडने सामना एक डाव आणि 39 धावांनी विजयी केला होता. या सामन्याबद्दल आज सांगण्याचे कारण म्हणजे हा सामना 21 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे 18 ऑगस्ट, 2000 रोजी खेळला गेला होता.

तर हा सामना 17 आणि 18 ऑगस्ट, 2000 रोजी इंग्‍लंड आणि वेस्‍ट इंडीज (England vs West Indies) या संघामध्ये खेळवला गेला होता. ज्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करत 172 धावा केल्या. ज्यात रामनरेश सरवनने नाबाद 59 केल्या होत्या. त्याच्याशिवाय इतर खेळाडूंना खास कामगिरी करता आली नाही. इंग्लंडकडून क्रेग व्‍हाइटने पाच तर डॅरेन गॉफने तीन बळी घेतले होते. त्यानंतर इंग्‍लंडचा पहिला डाव 272 धावांवर आटोपला. ज्यात माइकल वॉनने 76, ग्रेम हिकने 59 आणि ग्राहम थोर्पने 46 धावा केल्या. वेस्‍टइंडीजकडून कर्टली एंब्रोस आणि कर्टनी वॉल्‍शने चार-चार विकेट्स घेतले.

अवघ्या 61 धावांवर वेस्‍ट इंडीज सर्वबाद

ज्यानंतर वेस्ट इंडिज संघाने दुसऱ्या डावात फलंदाजीला सुरुवात केली. बघता बघता वेस्ट इंडिजचे खेळाडू तंबूत परतू लागले आणि अवघ्या  61 धावांवर संघ सर्वबाद झाला. सर्वाधिक धावा कर्णधार जिमी एडम्‍सने (19) केल्या. पाच फलंदाज तर शून्यावर बाद झाले. ज्यामुळे इंग्‍लंडला एक डाव आणि 39 धावा अशा मोठ्या फरकाने विजय मिळाला. वेस्‍टइंडीजचा दुसरा डाव अवघ्या 61 धावांवर आटोपण्यात इंग्लंडच्या अँडी कॅडिक याचे पाच आणि डॅरेन गॉफ याचे चार विकेट्स महत्त्वाचे ठरले. कॅडिकने तर एका षटकातच चार फलंदाजाना तंबूचा रस्ता दाखवला होता.

इतर बातम्या

IND vs ENG: तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी ‘हा’ खेळाडू संघाबाहेर, लॉर्ड्स कसोटीत विजयानंतरही संघात बदलाची शक्यता

IND vs ENG : असं काय घडलं? ज्यानंतर भारताने सामना अनिर्णीत न सोडता जिंकायचाच ठरवलं, विराटने दिलं उत्तर

IND vs ENG : बुमराह नडला, सिराज लॉर्ड्सवर थेट भिडला, भारताचा इंग्लंडवर थरारक विजय

(England cricket team beat west indies in just two days at test match by inning and 39 runs in leeds)

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...