AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी ‘हा’ खेळाडू संघाबाहेर, लॉर्ड्स कसोटीत विजयानंतरही संघात बदलाची शक्यता

भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडला दुसऱ्या कसोटीत 151 धावांनी मात देत मालिकेमध्ये 1-0 ची आघाडी मिळवली आहे. ज्यामुळे आता तिसऱ्या कसोटीकडे दोन्ही संघाचे लक्ष लागून आहे.

IND vs ENG: तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी 'हा' खेळाडू संघाबाहेर, लॉर्ड्स कसोटीत विजयानंतरही संघात बदलाची शक्यता
भारतीय कसोटी संघ
| Edited By: | Updated on: Aug 17, 2021 | 7:05 PM
Share

लंडन : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात पार पडला. या सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंनी अप्रतिम सांघिक खेळाचे दर्शन घडवत इंग्लंडवर 151 धावांनी विजय मिळवला. या विजयासह मालिकेतही भारताने 1-0 ने आघाडी घेतली. त्यामुळे आता तिसऱ्या कसोटीतही विजयाची मालिका कायम राखण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील असले. पण त्यासाठी भारतीय संघात एक महत्त्वाचा बदल होण्याची दाट शक्यता निर्माण झाली.

भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) या तिसऱ्या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे. याचे कारण पहिल्या दोन्ही कसोटींत संधी मिळाल्यानंतरही जाडेजाने काही खास कामगिरी केलेली नाही.  त्यातच दुसऱ्या कसोटीमध्ये इंग्लंडचा अष्टपैलू फिरकीपटू मोईन अलीने भारताचे महत्त्वाचे दोन विकेट घेतले. पण जाडेजाला मात्र एकही विकेट घेता न आल्याने तिसऱ्या सामन्यात त्याला संघाबाहेर ठेवले जाऊ शकते.

आश्विनला संधी मिळण्याची शक्यता

रवींद्र जाडेजाला उत्तम पर्याय म्हणून रवीचंद्रन आश्विनला संधी मिळू शकते. सध्या जागतिक क्रिकेटमधील उत्कृष्ट फिरकीपटूमध्ये अव्वल क्रमांकावर असणारा आश्विन फलंदाजीमध्येही चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात जाडेजाच्या जागी अंतिम 11 मध्ये आश्विनला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

भारत आणि इंग्लंडमधील उर्वरीत कसोटी मालिकांचे वेळापत्रक

पहिली कसोटी, 4 ते 8 ऑगस्ट (सामना अनिर्णीत)

दुसरी कसोटी, 12 ते 16 ऑगस्ट (भारत विजयी)

तिसरी कसोटी, 25 ते 29 ऑगस्ट

चौथी कसोटी, 2 ते 6 सप्टेंबर

पाचवी कसोटी, 10 ते 14 सप्टेंबर.

इतर बातम्या

IND vs ENG : असं काय घडलं? ज्यानंतर भारताने सामना अनिर्णीत न सोडता जिंकायचाच ठरवलं, विराटने दिलं उत्तर

IND vs ENG : बुमराह नडला, सिराज लॉर्ड्सवर थेट भिडला, भारताचा इंग्लंडवर थरारक विजय

IND vs ENG : लॉर्ड्सवरील विजयानंतर विराट आणि रोहितचा आनंद गगनात मावेना, पाहा VIDEO

(Ravindra jadeja may not be in playing 11 for third test against england at leeds)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.