IPL 2021: BCCI ला मोठं यश, ‘या’ देशाचे खेळाडू आयपीएलमध्ये खेळणार, सीएसके संघाला सर्वाधिक फायदा

| Updated on: Aug 03, 2021 | 1:30 PM

आयपीएल 2021 मागील मे महिन्यात स्थगित झाली होती. आता उर्वरीत सामने 19 सप्टेंबरमध्ये यूएईमध्ये होणार असून यावेळी परदेशी खेळाडूंचा सहभाग ही बीसीसीआयसमोरील सर्वात मोठी समस्या आहे.

IPL 2021: BCCI ला मोठं यश, या देशाचे खेळाडू आयपीएलमध्ये खेळणार, सीएसके संघाला सर्वाधिक फायदा
आयपीएल 2021
Follow us on

मुंबई : आयपीएल 2021 (IPL 2021) कोरोनाच्या शिरकाव झाल्याने मध्येच थांबवण्यात आली. आता उर्वरीत स्पर्धा युएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या आयोजना संबधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) एक मोठं यश मिळालं असून आयपीएलमधील बऱ्यात संघासाठी देखील एक दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. परदेशी खेळाडूंचा आयपीएलमध्ये सहभाग ही मोठी समस्या बीसीसीआयसमोर असताना महत्त्वाचे खेळाडू असणाऱ्या इंग्लंड क्रिकेट बोर्डातील खेळाडूंना इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) आयपीएलमध्ये खेळण्यास परवानगी दिली आहे. यामुळे राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाइट राइडर्स सारख्या संघाना मोठा फायदा होणार आहे.

आयपीएल 2021 चा उर्वरीत सामन्यांमधील पहिला सामना 19 सप्टेंबर रोजी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स (MI vs CSK) यांच्यात होणार आहे. आयपीएल 2021 मध्ये इंग्लंडचे तब्बल 12 खेळाडू खेळतात. एएनआयला बीसीसीआय़च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “यूएईमध्ये IPL पुन्हा सुरु होणाऱ्या सामन्यांना इंग्लंडचे खेळाडू उपलब्ध असणार आहेत.”

इंग्लंड-बांग्लादेश मालिका रद्द झाल्याचा फायदा

आयपीएल स्पर्धेवेळीच इंग्लंड संघ बांग्लादेशचा दौरा करणार होता. दोन्ही संघात मर्यादीत षटकांचे सामने खेळवले जाणार होते. सध्या ही मालिका स्थगित करुन पुढे ढकलण्यात आली आहे. दोन्ही क्रिकेट बोर्डानी मिळून हा निर्णय घेतला आहे. पण याचा फायदा बीसीसीआयला झाला असून IPL 2021 साठी दोन्ही संघाचे खेळाडू आता खेळू शकणार आहेत.

या खेळाडूंच्या पुनरागमनाकडे सर्वांचे लक्ष

इंग्लंडच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यास परवानगी देण्यात आल्याने सर्वाधिक फायदा धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सला होणार आहे. चेन्नईचा मोईन अली आणि सॅम करन हे सर्वात महत्त्वाचे खेळाडू या निर्णयामुळे स्पर्धेत सहभाग घेणार आहेत. याशिवाय कोलकाता नाइट राइडर्सचा कर्णधार इयॉन मॉर्गनही यामुळे स्पर्धेत सहभाग घेऊ शकेल. तर राजस्थान रॉयल्स संघाचा सलामीवीर जॉस बटलर आणि दुखापतीतून सावरल्यास गोलंदाज जोफ्रा आर्चर या निर्णयामुळे संघात असेल. याशिवाय सनराइजर्स हैद्राबादचा सलामीवीर जॉनी बेयरस्टो,  दिल्लीचा क्रिस वॉक्स, टॉम करन आणि सॅम बिलिंग्स यांच्या पुनरागमनाचा ही त्यांच्या संघाला फायदा होईल.

इतर बातम्या

IPL 2021: यूएईत 19 सप्टेंबरपासून घमासान, पहिल्या सामन्यात मुंबई VS चेन्नई भिडणार, पाहा संपूर्ण टाईमटेबल एका क्लिकवर

(England Cricketers available for IPL 2021 bcci gets green light from ECB)