माँटी पनेसारची भविष्यवाणी, इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेत ‘हा’ संघ 5-0 ने जिंकेल!

"पाच सामन्यांच्या मालिकेत भारत इंग्लंडला 5-0 असं हरवून क्लिन स्वीप देऊ शकतो, अशी भविष्यवाणी इंग्लंडचा माजी फिरकीपटू माँटी पानेसरने केली आहे. (monty panesar Prediction India vs England test Series)

माँटी पनेसारची भविष्यवाणी, इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेत 'हा' संघ 5-0 ने जिंकेल!
माँटी पनेसर (इंग्लंडचा माजी फिरकीपटू)
Follow us
| Updated on: May 22, 2021 | 1:22 PM

मुंबई : विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखालील भारतीय संघ इंग्लंड (India Tour of England) दौऱ्यावर जातोय. येत्या 2 जूनला इंग्लंडला रवाना होण्यासाठी भारतीय संघ टेक ऑफ करेल. भारत आणि न्यूझीलंड (India vs Nea Zealand) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC Final 2021) अंतिम सामना 18 ते 22 जून दरम्यान साउथहॅम्प्टन येथे खेळविला जाणार आहे. या सामन्यानंतर भारताला इंग्लंड (India vs England) विरोधात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. एकंदरीतच भारताच्या इंग्लंड दौऱ्याकडे संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष लागलंय. अशातच इंग्लंडचा माजी फिरकीपटू माँटी पानेसरने (Monty Panesar) या दौऱ्याबाबत मोठी भविष्यवाणी वर्तवली आहे. (England Former bowler Monty Panesar Prediction India vs England test Series)

माँन्टी पनेसरची मोठी भविष्यवाणी

“भारतीय संघ अतिशय योग्य वेळी इंग्लंडचा दौरा करत आहे. कारण भारतीय संघातले सगळेच खेळाडू तुफान फॉर्मात आहेत. ऑगस्ट महिन्यात इंग्लंडमधील वातावरणात गरमी असेल. याचाच फायदा भारतीय संघ घेऊ शकतो. संघात दोन फिरकीपटूंना संधी देऊन इंग्लंडला पाच सामन्यांच्या मालिकेत 5-0 म्हणजेच क्लिन स्वीप देण्याची धमक भारतीय संघात आहे, अशी भविष्यवाणी माँन्टी पनेसरने केली आहे.

…तर विदेशातला सगळ्यात मोठा विजय

“भारतीय संघातील खेळाडू दमदार आहेत तसंच तुफान फॉर्मात देखील आहेत. त्यामुळे इंग्लंडला पाच सामन्यांच्या मालिकेत 5-0 असं हरवून भारत क्लिन स्वीप देऊ शकतो, तशी ताकद भारतीय संघात आहे. जर भारतीय संघाने अशी कामगिरी केली तर विदेशात भारतासाठी हा सगळ्यात मोठा विजय असेल”, असंही माँटी म्हणाला.

असा असेल इंग्लंड दौरा

जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनल

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड, 18 ते 22 जून, साउथ्मपटन

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी, 4 ते 8 ऑगस्ट

दुसरी कसोटी, 12 ते 16 ऑगस्ट

तिसरी कसोटी, 25 ते 29 ऑगस्ट

चौथी कसोटी, 2 ते 6 सप्टेंबर

पाचवी कसोटी, 10 ते 14 सप्टेंबर.

अशी आहे टीम इंडिया :

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव. केएल राहुल आणि वृद्धिमान साहा

राखीव खेळाडू : अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि अर्जान नाग्वासवाला.

(England Former bowler monty panesar Prediction India vs England test Series)

हे ही वाचा :

IPL स्थगित झाली नसती तर मीच स्पर्धा सोडली असती, चहलच्या तडकाफडकी निर्णयामागचं ‘इमोशनल’ कारण

बॅट्समन नवऱ्याची ऑलराऊंडर पत्नी, व्हॅलेंटाईनदिनी खास मुलाखत, ‘क्रिकेट प्रेम आणि बरंच काही’!

‘कुठंबी शिरतोय, धिंगाणा करतोय…’, विराटसेनेचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबदबा, वाचा खास रेकॉर्ड!

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.